आष्टी दि.२५:अशोक गर्जे― कटकटीचा वाद विकोपाला ,बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची माहिती समोर येत आहे.आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे दि.२३/६/२०२० रोजी खून झाल्याची बातमी आठवडा विशेष ने दिली होती.
सविस्तर वृत्त असे की ,तालुक्यातील पिंपरखेड येथील घटनेतील मृतव्यक्ती रामदास पांडुरंग चव्हाण ,वय ३५ हा २२ तारखेला दारू पिऊन रात्री शेतात जनावरांच्या गोठ्यात झोपला होता. रात्री आरोपी पांडूरंग चव्हाण यांनी झोपेत पुत्र रामदासच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली असल्याची कबुली बापाने दिली आहे.मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने पोटच्या पोराला मारले आहे.
मृत रामदास यांच्या पत्नी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.