अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या’ वतीने ११ व्या ‘मराठा साहित्य संमेलनाचे’ आयोजन (पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन) कोरोना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सध्या समाजापुढे अनेक आव्हाने आहेत.त्याच बरोबर ताण-तणावात संपुर्ण समाज वावरत आहे.अशा परिस्थितीमध्ये समाजाला एक दिशा मिळावी,सकारात्मक ऊर्जा मिळावी,ताणतणाव कमी व्हावा या हेतूने २७ जून ते २९ जून या कालावधीत ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,महाराष्ट्र’ ११ वे मराठा साहित्य संमेलन व पहिले ऑनलाइन साहित्य संमेलन आयोजित करीत आहे.
या संमेलनाची सुरुवात शनिवार,दिनांक २७.०६.२०२० रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. संमेलनाचे उद्घाटन कामाजी पवार (वन अधिकारी तथा राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ,नांदेड) हे करणार आहेत.त्यानंतर सूत्र प्रधान पूर्व अध्यक्ष इंद्रजित भालेराव (प्रसिद्ध कवी परभणी) हे मनोगत व्यक्त करतील.यानंतर ११ व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक राणा (यवतमाळ) हे अध्यक्षिय मनोगत मांडतील.स्वागत प्रास्ताविक परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ.निर्मलाताई पाटील (सांगली) या करतील.रविवार दि.२८.०६.२०२० रोजी पहिले चर्चासत्र विषय -‘नैसर्गिक आपत्तीवर संत वाङमयातून व्यक्त झालेले उदगार’ हे होईल.या सत्राचे अध्यक्ष प्रा.गंगाधर बनबरे (पुणे),वक्ते प्रा.डॉ.छाया महाले (यवतमाळ) व प्रा.डॉ.रवींद्र बेंबरे (नांदेड) हे असतील.तर सोमवार,दि.२९.०६.२०२० रोजी दुसरे चर्चासत्र होईल.विषय-‘जागतिक महामारी कोरोना नंतर साहित्यिक व सामाजिक चळवळी वर होणारा परिणाम व उपाय’ या सत्राचे अध्यक्ष डॉ.मनोज तायडे (अमरावती),वक्ते प्रा.डॉ.मंजुश्री पवार (कोल्हापूर) व डॉ.विजय चोरमारे(मुंबई) हे आपले विचार मांडतील.याच दिवशी समारोपीय सत्रात अॅड.पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष,मराठा सेवा संघ.) समारोपीय मार्गदर्शन करतील.दररोज सायं.ठीक ५ वाजता जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,महाराष्ट्र या अधिकृत फेसबुक पेजवर ‘डॉ.सरोजिनी बाबर ऑनलाईन विचारपीठावरून’ कार्यक्रम सुरू होईल, https://www.facebook.com/JTSPMaharashtra/
या फेसबुक पेज लिंकवरून सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या’ वतीने करण्यात येत आहे.डॉ.निर्मला पाटील (प्रदेशाध्यक्षा),जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र,प्रा.डॉ.प्रकाश काळे (प्रदेश कार्याध्यक्ष),सुरेश राऊत (प्रदेश उपाध्यक्ष),प्रा.डॉ. ह.सो.बिडवे (प्रदेश सचिव), विभागीय अध्यक्ष नागनाथ जाधव,विभागीय कार्याध्यक्ष प्रल्हाद कराळे,जिल्हाध्यक्ष विश्वंभर वराट,जिल्हा सचिव प्रमोद जाधव जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धेश्वर इंगोले,जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर नांदवटे,केज तालुकाध्यक्ष विष्णू आबा तपसे,धारूर तालुकाध्यक्ष नवनाथ रेपे,भारत सालपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अकराव्या ऑनलाइन साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे.