पाटोदा तालुकाशेतीविषयक

हे सरकार भांडवलदाराचे असून शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले ; अच्छे दिनाच्या नावाखाली फसवे दिन आणले - शेतकरी नेते गणेश कवडे

आठवडा विशेष|प्रतिनिधी

पाटोदा दि.१५ : पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना या सरकारने आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे काम केले आहे सरकार रोज एक नवीन घोषणा करत आहे आणि जीआरमध्ये असे निकष टाकतात ९० टक्के शेतकरी त्यात बसत नाही अशी वस्तुस्थिती खाली दिसत आहे म्हणजे आंधळं दळतंय कुत्र पिठ खातय अशी परस्थिती सरकारची झाली आहे छत्रपती सन्मान योजना ही अशीच फसवी निघाली आहे असे प्रसिध्दी पत्रक सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यानी दिले प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे कि सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही कर्जमाफी दिली परंतु कर्जमाफीत पाटोदा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक शाखेमध्ये ४५०० शेतकऱ्यांपैकी ८०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी आली मराठवाडा बँकेत सतराशे पन्नास पैकी ५५९ एवढ्या लोकांना कर्जमाफी आली एसबीआय बँकेत हीच अवस्था आहे म्हणजे छत्रपती सन्मान योजना पूर्णपणे फसवी आहे लोक रोज पासबुक घेऊन बँकेमध्ये चक्रा मारण्याचे काम करतायेत आणि माफीत माझं नाव आलं का हे बघतात परंतु कुणाचेही नाव या माफीत बसायला तयार नाही म्हणजे ही योजना कसली असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे विमा संदर्भात अशी परिस्थिती आहे की २०१६ चा विमा कंपनीने ज्वारी रब्बी पिकासाठी मंजूर केला आहे त्यामध्ये एसबीआय बँकेत एक हजार लोकांनी ज्वारी रब्बी चा विमा भरला २४७ लोकांना तिथे विमा आला मराठवाडा बँकेतील सत्तावीसशे लोकांनी भरला तिथे फक्त आठशे लोकांना मिळाला वेगळ्या वेगळ्या शाखेत पूर्ण तालुक्यात हीच परिस्थिती आहे म्हणजे विमा कंपनीत सुद्धा या सरकारचा अंकुश नसल्यामुळे खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. २०१६ साली अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या जमिनीचा मावेजा येऊनही लोकांना पैसे मिळायला तयार नाही त्याच्यामध्ये सरकारने अल्पभूधारक आणि भूधारक शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित करून पैसे रोखले पाटोदा तालुका तीव्र दुष्काळामध्ये शासनाने जाहीर केला आहे मग शासन अल्पभूधारक आणि भूधारक हा विषय मांडून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे कारण भूधारक शेतकरी पूर्णपणे या दुष्काळात होरपळून निघला आहे
मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यामध्ये सरासरी एकया खेड्यांमध्ये ७५ टक्के लोकांना सहा ते सात एकर जमिनी आहेत बऱ्याच लोकांची खातेफोड झालेली नाहीये आणि शेतकरी आपल्या नावावर ती जमीन सहजासहजी मुलांच्या नावावर करत नाही कारण त्यांचा समज मुलगा कर्जबाजारी झाला तर जमीन विकून टाकल असे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वृत्ती आहे आणि सरकार अल्पभूधारकांच्या नावाखाली योजना जाहीर करतय आणि ७५ टक्के लोक या योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे केंद्र शासनाने आता जाहीर केलेली योजना किसान सन्मान योजना मोठ्या दिमाखात आणि गाजावाजा करून योजना आणली पण हे शेतकऱ्यासाठी महिन्याला पाचशे रुपये खात्यावर जमा करणार पाचशे रुपये मध्ये शेतकऱ्यांनी कसे भागवायचे हे गणित आता मोदी साहेबांनी सांगायची वेळ आली आहे पाच लाख रुपये पर्यंत इन्कम टॅक्स फ्री ही घोषणा सरकारने केली शेतकऱ्यांनी महिन्याला तीन हजार रुपये द्यावे म्हणून दहा वर्षापासून मोर्चे काढतात आणि नोकरदारांनी भांडवलदारांनी न मागता त्यांना पाच लाख रुपये इन्कम टॅक्स फ्री करून टाकला म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करून भांडवलदाराला हाताशी धरण्याच काम करत आहे आणि या योजनेमध्ये पाटोदा तालुक्यातील एका गावामध्ये २० टक्के लोक योजनेमध्ये बसतात बाकीच्या लोकांना भूधारकांच्या नावाखाली वगळली जाणार आहेत म्हणजे शासनाचा नुसता घोषणांचा पाऊस आहे खाली पाहिलं तर एकही योजना लोकांपर्यंत पोचणार नाही अल्पभूधार कातही नवरा-बायकोचं एकत्र कुटुंब केल्यामुळे ७५ टक्के लोक वगळली जाणार आहेत नुसतं जहिरात बाजी करून हे सरकार लोकांना फसवण्याचे काम करत आहे खरंतर या सरकारने मराठवाड्यात तरी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांची लाईट बिल पूर्ण माफ केली पाहिजेत चारा छावण्या याच्यावर भर देऊन पाण्याची व्यवस्था जनावरांना केली पाहिजे आज पशुधनही सरकारची अशीच धोरणे राहिली तर जगल का नाही याची शंका आहे शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आला आहे २०१७ चा ही विमा फक्त हजार दीड हजार असा आला आहे पुन्हा एक नवीन घोषणा केली आहे हेक्टरीसहा हजार रुपये अनुदान देण्याची तेही निकषात लोकांपर्यंत पोहोचवून देण्याची भावना आहे का नाही हे सांगता येत नाही खरच शेतकऱ्याला जर या दुष्काळजन्य परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम करायचं असेल तर हेक्टरी ५०००० हजार रूपये अनुदान दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळू शकतील शेतकऱ्यांची मुले आज बाहेर शिकण्यासाठी आहेत त्यांना एज्युकेशन लोन बँकेकडून देण्याचे आदेश दिले पाहिजे परंतु हे सरकार भांडवलशाहीचं आहे या सरकारमध्ये एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बाजूचा नाही म्हणून ही अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे राज्य शासनाची अवस्था तर महाभारतातल्या गांधारी सारखी आहे दिसून ही डोळ्यावर पट्टी बांधण्याचे काम सरकार करत आहे सगळी वस्तुस्थिती शेतकरी नेते गणेश कवडे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकानुसार दिली येणाऱ्या काळा मध्ये शेतकरी सरकारबद्दलचा आक्रोश आपल्या मता मधुन दाखवून देईल असे ही त्यांनी नमूद केले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.