पाचोरा: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आषाढी एकादशीचे निमित्त साधुन सरस्वती शिशुवाटीका,पाचोरा च्या चिमुकल्यांची वृक्ष-दिंडी आयोजित केली गेली.या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी श्री.विठ्ठल,रुक्मिणी यांचे पोशाख धारण केले होते तर काही विद्यार्थ्यांनी वारकरींच्या पोशाखात टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला.दिंडीत शिशुवाटीकेत बनविलेली पालखी होती,विद्यार्थ्यांच्या हातात तुळस,वृक्ष,घोषवाक्यांचे फलक होते व विद्यार्थी घोषणाही देत होते.वृक्ष दिंडी ही एम.ए.आय.डी.सी.कॉलनी,कालिका नगर व परिसरातून निघाली.दिंडीमध्ये काही पालकही सहभागी होते.
दिंडीच्या यशस्वीतेसाठी शिशुवाटीकेच्या प्रधानाचार्या सौ.भारती मोरे व आचार्या सौ.पुष्पा वारुळे यांनी नियोजनपूर्वक कष्ट घेतले.या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री.संतोष मोरे,संचालक श्री.रवींद्र पाटील,जि.प.शिक्षक श्री.किशोर पाटील सर,कृषी अधिकारी श्री.दिपक पाटील हे सुद्धा उपस्थित व सहभागी होते.वृक्ष दिंडीत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह व आनंद दिसत होता.