अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रक्तपेढीत स्वाभिमान संघटनाचे वतीने महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 51 युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.रक्तपेढीत मुबलक साठा असल्याने इच्छा असूनही केवळ 51 युवकांनाच रक्तदान करता आले.पुढील काळात स्वारातीचे अधिष्ठाता यांचे सुचनेनुसार व रूग्णालयाचे आवश्यकते प्रमाणे स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते रक्तदान करतील अशी माहिती रक्तदान शिबिराचे आयोजक मनोजभैय्या कदम यांनी दिली.
मंगळवार,दिनांक 23 जून रोजी स्वाभिमान संघटनाचे वतीने महाराष्ट्राचे युवा वैभव आमदार नितेशजी राणे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे,बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे,स्वाभिमान संघटनाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम,बोरी सावरगांवचे सरपंच सुनिल देशमुख,नगरसेवक दिनेश भराडीया या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्र राज्यात विधायक : सामाजिक व अन्यायाविरूध्द लढणारी संघटना म्हणून स्वाभिमान संघटना ओळखली जाते.स्वाभिमान संघटनाचे आमदार नितेश नारायणरावजी राणे हे
संस्थापक अध्यक्ष आहेत.महाराष्ट्रात मनोजभैय्या कदम (महाराष्ट्र संपर्कप्रमुख,स्वाभिमान संघटना) यांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने अनेक लोकहिताची व जनसेवेची कामे केली आहेत.नेता असावा आ.नितेशजी राणे यांच्या सारखा आणि कार्यकर्ता असावा तर मनोज कदम यांच्या सारखा.जीवाला जीव देणारा.सामाजिक बांधिलकी जोपासणारा अशी प्रतिक्रिया रक्तदान शिबिरास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी स्वाभिमान संघटनाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम,भिमसेन आप्पा लोमटे,प्रशांत चव्हाण,रघु सुरवसे,धनंजय कावळे,संदीप जाधव,अशोक गडदे,संतोष कदम,दत्ता साखरे,किशोर गडदे,राम कावळे,सुमित लोमटे तसेच मनोज (भैय्या) कदम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.
कार्यकर्त्यांवर बंधुवत प्रेम करणारा नेता
स्वाभिमान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष आमदार नितेशजी नारायणराव राणे हे संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर भावासारखे प्रेम करतात.जनतेप्रमाणेच
सामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जातात.सुख-दु:खात सहभागी होतात.महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्य करणा-या नेत्यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.त्याबद्दल सर्व युवकांचे संघटनेच्या वतीने आभार मानतो.―मनोज भैय्या कदम (महाराष्ट्र संपर्कप्रमुख स्वाभिमान संघटना.)