अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

अंबाजोगाईत सार्वजनिक शिवजयंती निमित्त उत्सव समितीच्या वतीने झेंडावंदन,शेतक-यांना अल्पोपहार, गुरांना चारा,पाण्याचे हौद वाटप कार्यक्रम, रक्तदान शिबीर

अंबाजोगाई(प्रतिनिधी):गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुक यंदा दुष्काळामुळे रद्द करण्यात आली आहे. मिरवणूकीऐवजी विविध समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.ज्यात झेंडावंदन,शेतक-यांना अल्पोपहार,गुरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचे हौद वाटप आदी समाजउपयोगी कार्यक्रमांचे तसेच रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल काका लोमटे यांनी दिली आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की,रविवार,दि.17 फेब्रुवारी रोजी घाटनांदूर येथील आठवडी बाजारात सर्वपक्षीय कार्यकर्ते हे शेतक-यांना अल्पोपहार,गुरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचे हौद वाटप करतील.तसेच सोमवार, दि.18 फेब्रुवारी रोजी आडस येथील आठवडी बाजारात शेतक-यांना अल्पोपहार,गुरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचे हौद वाटप करण्यात येतील.आणि मंगळवार,दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडावंदन, जिजाऊ वंदना होईल. तसेच उपस्थित मावळे रक्तदान शिबीरात सहभागी होतील. त्याचप्रमाणे मंगळवार, दि.19 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील आठवडी बाजारात शेतक-यांना अल्पोपहार,गुरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचे हौद वाटप करण्यात येतील व सहभागी मावळ्यांना
फराळाचे वाटप करण्यात येईल. रणजितचाचा लोमटे यांनी भव्यदिव्य नाविण्यपुर्ण अशी शिवजयंती मिरवणुक महाराष्ट्राला परिचित करून दिलेली आहे. सध्या सुनिलकाका लोमटे हे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत.अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळी परस्थितीमुळे यंदा भव्य मिरवणुक रद्द करून समाजउपयोगी उपक्रम आयोजित केले आहेत.
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वितेसाठी
शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका यांचे मार्गदर्शनाखाली नगरसेवक अनंतदादा लोमटे,अमर देशमुख, रणजितचाचा लोमटे, रविकिरण देशमुख,शरद लोमटे,प्रविण देशमुख, महेशकाका लोमटे, दुष्यंत लोमटे,नवनाथ उबाळे,नितीन कातळे आदी मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे.

दुष्काळामुळे यावर्षी मिरवणूकीऐवजी समाजउपयोगी उपक्रम-उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहुर्तावर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या शहरात गेल्या अनेक वर्षांपासुन भव्य मिरवणुक व फार मोठे कार्यक्रम घेतले जातात.रणजितचाचा यांनी ही परंपरा सुरू करून संपुर्ण महाराष्ट्राला अंबाजोगाईतल्या शिवजयंतीची अनोखी ओळख करून दिली.यावर्षी फार मोठा शिवजन्मोउत्सव साजरा करता येणार नाही. कारण,यंदा दुष्काळ आहे.शेतकरी बांधवच अडचणीत आहेत.तेव्हा
पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुकीची परंपरा कायम ठेवु अशी माहीती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांनी दिली.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.