परळी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बियाणे न उगवण्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे शेतकरी करीत आहेत यामध्ये सर्व बी बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांचे काहीच वाकडे होत नाही असा त्यांचा भ्रम आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे मध्यप्रदेश मधून 40 हजार मेट्रिक टन सोयाबीनचे बी बियाणे बाजारपेठेतून खरेदी करून बोगस बियाणे सर्व कंपन्यांनी वेगवेगळ्या पिशव्या भरून महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ते बियाणे विक्रेत्याच्या माध्यमातून विकीत आहेत यामध्ये राज्य कृषी गुणनियंत्रण विभाग यांचे सर्व दूरलक्ष असून बनावट खते व औषधे ही प्रकरणे खूप मोठ्या निविष्ठांची गुणवत्ता तपासणी आयुक्त कार्यालयाकडून एस ए ओ जे डी ए डायरेक्टर आयुक्त कार्यालयाकडील संपूर्ण जॉब दिले असते खते बियाणे कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासून प्रमाणित अप्रमाणित रिपोर्ट देणे बंधनकारक असते निरक्षक सहसंचालक गुणवत्ता निरीक्षक राज्याचा मुख्य गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांच्यामार्फत प्रयोगशाळेत खते बी-बियाणे औषधी ची वर्गवारी नियमाप्रमाणे केली जात नाही प्रयोग शाळेवर नियंत्रण नाही तसेच कृषी विद्यापीठे यांचेही आयुक्त कार्यालय साटेलोटे असून सोनेरी टोळी कृषी कार्यालयात काम करीत आहे कृषी विभागात चांडाळ चौकडी च्या माध्यमातून दलालांच्या मार्फत गुणनियंत्रण विभागात कृषी निविष्ठा उद्योगात खते बी-बियाणे कीटकनाशके पुरवण्याचे काम उद्योगाकडून होते त्यात संशोधक शास्त्रज्ञ अभ्यासक प्रतिनिधी व्यवस्थापक संचालक मालकापर्यंत साखळी मदत करते निविष्ठा मध्ये काळे बाजार वाले घुसून अप्रमाणित सर्व नमुने निघत आहेत असे दाखवून उद्योजकांना जाळ्यात अडकून भ्रष्टाचाराचे सोनेरी टोळके कृषी खात्यात कार्यरत असून त्या सर्व खते बियाणे औषधे कंपनी वाल्यांचे व संबंधित दलाल व कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स व्हाट्सअप मेसेज तपासल्यावर खरा घोटाळा बाहेर येऊ शकतो असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी कृषी खात्यात संदर्भात केलेला आहे महाबीज ग्रीन गोल्ड गुगल कावेरी सीड तुळशी सीड्स रुची सीड्स व इतर कंपनीचे सोयाबीन नापास 65% च्या आत उगवण क्षमता असले तरी सत्य दर्शक बियाणे म्हणुन प्रमाणित बाजारात विक्रीस पाठवले आहे नापास बी-बियाणे पास करून सर्रास मध्यप्रदेश मधून 40 हजार मेट्रिक टन सोयाबीन बाजारपेठेतून चढ्या भावाने खरेदी करून विकत आणले आहे महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली कशी बोगस बियाणे बाबत महाबीज तुळशी सीड्स कावेरी सीड्स रुची ईगल ग्रीन गोल्ड व इतर कंपन्यांचे सोयाबीनचे सीड्स उगवले नाही म्हणून कृषी खात्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत महाराष्ट्रात शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासन बँक सहकार्य शेतकऱ्यांना करीत नाही शेतकऱ्याच्या पेरण्या बाबत कृषी खात शेतकऱ्या बरोबर जीवन-मरणाचा खेळ करीत आहे प्रयोगशाळेत नमुने तपासले नाहीत मान्यता दिली नाही तक्रारी आल्या तरी चांडाळ चौकडी प्रकरण नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करतात मी दि 13/ 2 /2019 व स्मरणपत्र चौकशीसाठी व 19 /7 /2019 ला सर्व मुद्दे निहाय खते बी-बियाणे औषधी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे तक्रार झालेली आहे चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 19/ 3/ 2019 व 20 ऑगस्ट 2019 ला मा आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांना आदेश दिलेले आहेत परंतु आजतागायत कारवाई केली जात नाही महाराष्ट्रात राज्य कृषी गुणनियंत्रण विभागात भ्रष्ट कारभार मुळे खते बी-बियाणे औषधी शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे मध्य प्रदेश गुजरात इतर राज्यातून उत्पादक कंपन्या बी बियाणे खते औषधे विनापरवाना राज्यात विक्री कशा करतात हा सर्व शेतकऱ्याच्या जीवाशी जीवन-मरणाचे खेळ चालू आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केलेला आहे परंतु चौकशी चांडाळ चौकडी दलाल उद्योगपती मार्फत दाबली जात आहे बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीचा भंग केलेला आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कृषी खात्याशी गैरकारभारा मुद्दे निहाय चौकशी करावी जे कर्मचारी या कटात दोषी आढळतील त्यांना निलंबित करावे व ज्या कंपन्या खते बी-बियाणे औषधी बोगस कंपन्यांचे लायसन रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.