महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांचे आवाहन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड,लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या कापूस उत्पादक शेतक-यांनी आपला कापुस पणन महासंघाकडे विक्री केला आहे.त्या शेतक-यांपैकी जर कोणत्याही शेतकरी बांधवाचे पेमेंट तांञिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे अद्यापही त्या शेतक-यांला मिळालेले नाही अशा शेतकरी बांधवांनी कापुस खरेदीची पावती,बँक पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स प्रति आदी कागदपत्रांसह तात्काळ मंगळवार,दिनांक 30 जून पर्यंत परळी विभागीय कार्यालयात संपर्क साधावा.जेणेकरून या शेतक-यांना त्यांच्या कापुस खरेदीचे पेमेंट लवकरच अदा करण्यात येईल अशी माहिती देवून परळी विभागातील कापुस उत्पादक शेतक-यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी,संचालक भरत चामले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट त्वरित होणार जमा
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कापुस खरेदी होत असून शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून लूट होऊ नये म्हणून कापुस खरेदी सुरू केली.कापसाला चांगला भाव मिळत आहे.त्याखाली खरेदी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले.शेतकऱ्यांना अधिक भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.कारण,शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाल्यास आपल्याला आनंदच होईल. कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर लॉकडाऊन काळात शेतक-यांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी घेतली.खासगी व्यापा-यांकडून लूट होणार नसल्याने शेतक-यांचा फायदाच होईल असा आम्हाला विश्वास आहे.यावर्षी शेतक-यांनी कापुस घातल्यानंतर लगेच त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.ज्या शेतक-यांचे राहीले असतील त्यांना ही लवकरच त्यांचे पेमेंट अदा केले जाईल.
―राजकिशोर मोदी (संचालक,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)
परळी विभाग राज्यात अव्वल
बीड,लातूर व उस्मानाबाद हे जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.त्यामुळे या तीनही जिल्ह्यात कापुस उत्पादक शेतक-यांना आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.यावर्षी
शेतक-यांना चार पैसे जास्तीचे मिळू शकतील.कारण,लॉकडाऊन कालावधीत ही महासंघाच्या वतीने शेतक-यांकडून ऑनलाईन नोंदणी करून कापुस खरेदी करण्यात आली.यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती.परंतू,शेवटच्या टप्प्यातील पावसाने कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे.त्यामुळे कापूस पणन महासंघाने कापसाला चांगला दर देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.जिल्ह्यात ज्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केले याचा कापूस उत्पादक शेतक-यांनी लाभ घेतला.यावर्षी परळी वैजनाथ विभागातील हंगाम 2019-20 शासकिय कापुस (पणन महासंघ) खरेदीची माहिती (दि.25/6/2020 अखेर)परळी विभागात 69,764 शेतक-यांनी त्यांचा तब्बल 17593328.55 क्विंटल एवढा कापुस पणन महासंघाकडे विक्री केला.विक्री केलेला कापुस 941 कोटी,24 लाख,7 हजार सातशे 43 रूपये एवढ्या किंमतीचा झाला.त्यापैकी सुमारे 910 कोटी रूपयांची पेमेंट थेट शेतक-यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.
―अॅड.विष्णुपंत सोळंके (उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)