परळी तालुकासामाजिक

पाटोदा येथील पत्रकार कोल्हे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची परळी पत्रकार संघाची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : पाटोदा येथील पत्रकार पोपट कोल्हे यांनी पाटोदा शहराला टँकद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा तहसीलदारांनी बंद केला या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करुन दुष्काळातील जनभावना मांडल्या परंतु दुष्काळी परिस्थितीत उपाय योजना करण्या ऐवजी पाटोदा येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी पाटी टइंचाईवर उपाय योजना शोधण्या ऐवजी पत्रकार कोल्हे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निंदनीय असुन या घटनेचा परळी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात येऊन सदरील गुन्हा मागे घेऊन तहसीलदार चित्रक यांची बदली करण्याची मागणी केली आहे.

यावेळी तहसीलदार परळी यांना परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. पाटोदा येथील पत्रकार पोपट कोल्हे यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाटोदा शहराला टँकरद्वारे सुरु असलेला पाणी पुरवठा तहसिलदार यांनी अचानक बंद करण्याच्या मथळ्याखाली पत्रकार पोपट कोल्हे यांनी दै.चंपावतीपत्र मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. वास्तविक पाहता या बातमीतुन बोध घेऊन तहसीलदार रुपा चित्रक यांनी पाणी टंचाई संदर्भात उपाय योजना करणे अपेक्षीत असतांना उलट त्यांनी बातमी का छापली याचा राग मनात धरुन पत्रकार कोल्हे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. तहसिलदारांचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य असुन याचा परळी पत्रकार संघाच्या वतीन जाहिर निषेध करण्यात येऊन कोल्हे यांच्यावरील हा गुन्हा त्वरीत मागे घ्यावा व तहसीलदार चित्रक यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने यानिवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालासाहेब कडबाणे, शहराध्यक्ष धिरज जंगले, धनंजय आढाव,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक मोहन व्हावळे, स्वानंद पाटील, प्रेमनाथ कदम, किरण धोंड, माणिक कोकाटे, महादेव गित्ते, बाबा शेख, शैलेश मुंडे, विश्वास महाराज पांडे, संभाजी मुंडे, गणेश आदोडे, शेख मुकरम , संतोष जुजगर, बालाजी ढगे, उपस्थित होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.