बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यासह सगळीकडे बोगस बियानामुळे सोयाबीन उगवली नाही यामुळे शेतकरी चिंतेत आहेत मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शिवसंग्राम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शिवसंग्रामचे अक्षय शिंदे शेतकऱ्यांना बोलतांना म्हणाले.
बीड जिल्ह्यसह वडवणी तालुक्यातील खापरवाडी तसेच देवगाव येथील काही शेतकऱ्यांचे फोन आले दहा दिवस सोयाबीन पेरून झाले मात्र सोयाबीन उगवलीच नाही याची तत्काळ दखल घेऊन शेतकरी पुत्र अक्षय शिंदे यांनी वडवणी तालुक्याचे संबंधित तालुका कृषी अधिकारी भगत साहेब यांच्याशी विनंती केली शेतकऱ्यांच्या न उगवलेल्या सोयाबीन बद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनतर ताबडतोब तालुका कृषी अधिकारी शेतात दाखल झाले सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात अर्ज देण्यास सांगितले आणि समितीला आदेश देऊन दुसऱ्या दिवशी साहेबांनी पंचनामा करून घेतला यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा आणी प्रश्न साहेबांना सागितले आणि बोगस बियाणाच्या कंपनीवर कार्यवाही करून दोबर पेरणीसाठी मदत मिळावी अशी मागणी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत शिवसंग्राम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभी आहे आम्ही आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही असे अक्षय शिंदे शेतकऱ्यांना बोलतांना म्हणाले.