अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यात जनता कोरोनाच्या संकटात असताना ? विद्युत मंडळाचा महावितरण कंपनीने घरगुती विजेची बिले अवाजवी पाठवून लोकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरू केले आहे.खरे तर लॉकडावून काळात संपूर्ण वीज बिल हे सरकारने माफ करायला हवे ? शिवसेना नेते खा.संजय राऊत सामनातून केंद्र सरकारचा इंधन वाढीवर लिहतात.मग विजेच्या अवाजवी बीलावर का लिहत नाही.? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.सामनाची भुमिका म्हणजे आपले ठेवायचे झाकून,दुस-याचे बघायचे वाकून असल्याची टिका त्यांनी केली आहे.या संदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे.की,देशात कोरोना संकट सुरू झाल्यापासून लॉकडाऊन आहे.प्रत्येक माणूस घरात बसून आहे.व्यापार उद्योगधंदे,कुठल्याही प्रकारे सुरू नाहीत.वीज वापर 100% बंदच आहे.एसी, फ्रीज,वापरू नका.अशा प्रकारचे आव्हान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुरूवातीला, केल्याने. जवळपास दोन महिने घरगुती वीज वापरात लोकांनी एसी पण लावले नाही.? घरात वीज वापर नेहमी पेक्षा कमीच झाला . सध्या जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे .
एका घासाची चिंता जनतेसमोर आहे.अशा परिस्थीतीत खरे तर राज्य सरकारने,घरगुती वीज बिले माफ करायला पाहिजे होती ? मात्र चोराच्या उलट्या बोंबा,प्रमाणे वीज बिले माफ करणे बाजूला राहिले.त्यापेक्षा कहर म्हणजे महावितरण कंपनीच्या लोकांनी.मीटर रिडींग प्रत्यक्ष न घेता ? अंदाजे अवाजवी बिले दिली.आज ज्या ग्राहकांना प्रतिमहिना एक हजार रूपये बिल येतं.त्यांना सहा हजार ते सात हजारापर्यंत बिल अकारणी झाली.राज्यात बहुतांश ठिकाणी अशाप्रकारे वाजवी बिल आल्याच्या तक्रारी.ग्राहकांनी केल्या असून फार मोठा संताप महावितरण कंपनीच्या विरोधात व्यक्त होत आहे.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बिले भरताना टप्पे पाडून देऊ असं,म्हटलं असलं तरी.जास्त बिल वाढून देणे याला जबाबदार कोण ? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विचारला आहे.दुसरीकडे शिवसेना नेते ते खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून आजच इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.मात्र त्यांची ही भूमिका म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं बघायचं वाकून ? अशाप्रकारचा आहे.असं वाटलं होतं.विजेच्या वाजवी बिलाबाबत सामनामधून काही टीका ? राज्य सरकार व ऊर्जा खात्यावर होईल.मात्र राजकारण किती जे सामान्य जनतेच्या प्रश्नाला वेठीस धरणार असते असा हा प्रकार आहे,सामनाने ऊर्जा खात्याला जनहितासाठी चांगला शॉक दिला असता तर,लोकांनी त्याचं स्वागत केलं असतं ? मात्र हे न घडे कधी ? असे कुलकर्णी यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.