अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने पाळला “शहिदों को सलाम दिवस”

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार,दि.26 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शहिदों को सलाम दिवस पाळून अभिवादन करण्यात आले.यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली तर मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येवून मेणबत्त्या पेटवून भारत-चीन सीमेवर शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भारताचा राष्ट्रीय ध्वज घेवून शहिद जवानांना वंदन करण्यात आले.बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना भारताच्या सशस्त्र सैन दलाला समर्थन आणि चीनी सैन्यांने हडपलेली भारतीय भूमी केंद्र सरकारने परत घ्यावी. अशी मागणी करून स्मारकासमोर कोणतीही घोषणाबाजी न करता फलक झळकावले.अत्यंत शांततेने तसेच फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क वापरून यावेळी काँग्रेस कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक असिफोद्दीन खतीब,डॉ.नंदकिशोर सोमवंशी, राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,डॉ.राजेश इंगोले, अ‍ॅड.खोगरे,सज्जन गाठाळ,गणेश मसने,खंडेराव टेमकर,सुनिल वाघाळकर,दिनेश घोडके, अशोक देवकर,सय्यद अमजद,प्रताप देशमुख,काजी असिफोदिन,अजय रापतवार,अकबर पठाण,गणेश गंगणे,रणजित पवार,विजय कोंबडे,सचिन जाधव,भारत जोगदंड, अमोल मिसाळ,अजीम जरगर,रणजित हारे,माऊली वैद्य,मतीन जरगर,जावेद गवळी,महेश वेदपाठक,विराज धिमधीमे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

भारतीय सीमांचे रक्षण करण्यात केंद्र सरकारला अपयश

भारत-चीन सीमेवर सैनिकांचे व सीमांचे रक्षण करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे.केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे 20 हून अधिक सैनिकांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. चीनने भाजप सरकारला गाफिल ठेवून भारताची शेकडो मैल भुमी बळकावली आहे.काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या सिमा,सैनिक व जनता सुरक्षित होती.केंद्रातील भाजप
सरकारच्या पळपुटे धोरणाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहिर निषेध करत आहोत.चीनी सैन्याने हडपलेली भारतीय भुमि केंद्र सरकारने परत घ्यावी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भारताच्या सशस्त्र दलाला सदैव समर्थन राहिल.

―राजकिशोर मोदी(जिल्हा अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,बीड.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button