अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दरात केलेल्या अन्यायकारक इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.शेतकरी व कष्टकरी समाजाला या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसू लागला आहे.इंधन दरवाढीमुळे महागाई अणखी वाढली आहे.या अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार,दि.29 जून रोजी बीड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व नेते,आजीमाजी पदाधिकारी,सर्व सेल व विभागाचे प्रमुख,विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, सोमवार,दि.29 जून रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दरात केलेल्या अन्यायकारक दरवाढी विरोधात बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.पेट्रोल व डिझेलची अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.काँग्रेस कार्यकर्ते बॅनर व फलक दाखवून इंधन दरवाढीचा निषेध करतील. फिजिकल डिस्टन्स राखून,मास्क घालून या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायचे आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे मा.राष्ट्रपती यांनी इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याविषयीची मागणी करणारे निवेदन देण्यात येणार आहे.याच दिवशी सोशल मिडियातून ‘स्पीक अप ऑन पेट्रोलियम प्रायसेस’ ही ऑनलाईन मोहिम चालविली जाणार आहे.या मोहिमेत काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी जनतेने मोेठ्या संख्येने सहभागी होवून केंद्र सरकारला जाब विचारावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.