पाटोदा तालुका

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाटोद्यात कडकडीत बंद पाकिस्तान विरोधात प्रचंड घोषणाबाजी, पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला

पाटोदा (प्रतिनिधी) दि.१६:जम्मु काश्मीर मधील पुलवामा जवळील अवंतीपुरा या गावाजवळ सैन्याचा दारुगोळा घेवून जाणाऱ्या सैन्यांच्या तुकडीवर जैश -ए- महंमद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात जवानांनी देशासाठी सवोच्च बलिदान दिले, या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात पाटोद्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला , त्याच प्रमाणे रॅली काढून पाकीस्तानला तात्काळ धडा शिकवा अशा संतप्त भावना व्यक्त करुन पाकड्यांचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला , या वेळी शहरातील शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन निघालेल्या रॅलीत नागरीक प्रचंड संख्येने सहभागी झाले होते , ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर सतंप्त नागरीकांनी पाकडयांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परीसर दणाणुन सोडला, या वेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला व आता पाकिस्तानला थेट पणे धडा शिकवलाच पाहीजे अशी एकमुखी मागणी करण्यात आली त्याच प्रमाणे शहीद जवाना प्रती आदरांजली अर्पण करुन राष्ट्रगीत झाले. या प्रसंगी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी ,देश प्रेमी नागरीक यांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button