जरंडी,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या जरंडी मंडळातील चार गावांना शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पावूस तर मंडळस्थित ठिकाणी मात्र तीन मी.मी पावसाची नोंद झाल्याने शुक्रवारी झालेल्या चमत्कारिक पावसाने मात्र प्रशासनालाही चक्रावून टाकले आहे.सतरा गावांसाठी निर्मित करण्यात आलेल्या जरंडी मंडळातील चार गावांना मात्र दुथडी भरून नद्या वाहू लागल्या असतांना पर्जन्यमापक असलेल्या ठिकाणी मात्र जरंडीला तीन मी.मी पावसाची नोंद करण्यात आल्याने प्रशासनासमोर पंचनामे कशाचा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंडळ गाव असलेल्या जरंडीपासून चार ते सात कि.मी अंतरावर असलेल्या बहुलखेडा,कवली,उमरविहीरे आणि निमखेडी या चार गावांना पावसाने जोरदार तडाखा दिला असून या पावसात खरीपाची कोवळी अंकुर शेतातून वाहून गेली असून काही भागात शेतजमिनी खरडल्या आहे.तर जरंडी मंडळ स्थित ठिकाणी मात्र केवळ तीन मी.मी पावसाची नोंद झाल्याने एकाच मंडळात पावसा अभावी खरीपाची पिके करपत असल्याने नुकसान तर दुसर्या बाजूने चार गावांना पावसाच्या पुरात कोवळी अंकुर असलेली खरीपाची पिके वाहून गेल्याने नुकसान अशी स्थिती शुक्रवारचं चमत्कारिक पावसाने निर्माण केली आहे.मंडळ स्थित गावाच्या शिवारात शुक्रवारी चक्क ठिबक सिंचनच्या पाण्यावर पिकांना जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून या मंडळातील जरंडीसह १२ गावांना शुक्रवारी पावसाने कोरडेठाक ठेवत चार गावांना मात्र मुसळधार हजेरी लावली आहे.त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनही चिंतेत पडले आहे.
या पूर्वीच अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल,कृषी आणि पंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.मात्र कमी पावूसाच्या हजेरी अभावी होरपळलेल्या पिकांना तूर्तास पंचनाम्याचे आदेश प्राप्त नाही.
―तहसीलदार सोयगाव प्रवीण पांडे