पाटोदा दि.२७:नानासाहेब डिडुळ― काल दुपारी ३ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने पाटोदा तालुक्यातील मौजे वैद्यकीन्हि आणि सौंदाणा गावातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पेरलेले बि-बियाणे खत यासह बांधबंदिस्ती फुटुन शेतातील माती सुद्धा वाहुन गेली आहे, कोरोनाने आधिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
विमल चौधरी :विहीर गाळाने बुजली
उन्हाळ्यात २५ हजार रुपये खर्च करून विहिरीतील गाळ काढला होता, काल आलेल्या मुसळधार पावसाने विहीर बुजून चालली होती, तसल्या पावसात जेसीबी लाऊन बांध टाकून घेतला त्याला ५ हजार रुपये खर्च आला. मालक मुके, दोन लेकरं, आता हे नुकसान मी काय करू तुम्हीच सांगा.
रेणुका चौधरी : कोठा पडला, नशिबानेच बाळ वाचलं
आम्ही बाळाला कोठ्यात झोका बांधून रानात काम करीत होतोय. अचानक जोराचा पाऊस आला आणि वारं सुटलं मी पळत कोठ्यात आले,बाळाला उचलून घेतलं आणि तेवढ्याच कोठा ढासळला.नशिब चांगलं म्हणून लेकरू वाचलं
जानकीबाई सुरवसे: उडीद,मुग खत वाहुन गेलं,आता पुढं काय करायचं
शेतात पेरलेले उडीद,मुग, सोयाबीन खत बियाणे सकट वाहुन गेले, बांध फुटले, माती वाहुन गेली ,आता आम्ही जगायचं कसं
डॉ.गणेश ढवळे: स्थळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे
पावसाने झालेल्या नुकसानीचे स्थळ पंचनामे करून बांधबंदिस्ती फुटुन शेतातील खत, बि-बियाण्यासह शेतातील माती सुद्धा वाहुन गेली आहे त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, बीड, रमेश मुंडलोड तहसिलदार पाटोदा यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.