जवानांच्या हल्ल्याचा सोयगाव तालुक्यात निषेध,जरंडीला सायंकाळी कँडल मार्च

सोयगाव दि.१६ (प्रतिनिधी):सोयगावसह तालुकाभर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भारतीय सेना दलाच्या जवानांना विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येवून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.शहरातील शिवाजी चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात येवून तालुक्यात कँडल मार्च,मूकमोर्चे काढण्यात येवून सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात आल्याने सोयगाव तालुक्याचा शनिवारचा दिवस निषेध आणि कँडल मार्च काढण्यात गुंग होता.
सोयगाव तालुक्यात झालेल्या घटनेचा विविध शैक्षणिक संस्था,सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी सर्वस्तरातून निषेध करून पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला.पाकिस्तानचं कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागात कँडल मार्च काढून नागरिकांनी निषेध केला.

जरंडी ता.सोयगावला अख्खा गाव सहभागी

जरंडी ता.सोयगाव येथे सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातून कँडल मार्च काढून घोषणांनी जरंडी परिसर निनादून गेला होता.गावातून काढण्यात आलेल्या या कँडल मार्चचा शहीद विष्णू चव्हाण यांच्या स्मारकाजवळ श्रद्धांजली अर्पण करून समारोप करण्यात आला.दरम्यान जरंडीतील कँडल मार्च मध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला यामध्ये चिमुकल्यासह अबालवृद्ध आणि तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्याने यावरून या घटनेची चीड दिसून आली होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.