कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कंटेन्मेंट झोन शिथिल

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.२७:आठवडा विशेष टीम― परळी शहरातील माधवयाग-शारदा नगर येथे १ कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे माधवबाग-शारदा नगर Containment Zone म्हणून घोषीत करुन भगवानबाबा चौक ते आश्रुबा मुंडे यांच्या टि हाऊस पर्यंतचा परिसर दिनांक १३ जून च्या आदेशानुसार पुढील अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (७ (३) अन्वये पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली होती. या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १३.०६.२०२० पासून मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    माधवबाग-शारदा नगर येथील कोरोना रुग्णास १४ दिवस पूर्ण झालेले असल्यामुळे शासनाचे नियमानुसार Containment Zone मधील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आणि एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत नसल्यामुळे यापूर्वीचे या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश शिधील करण्यात येत आहेत.सदरचे आदेश आज दिनांक २७.०६.२०२० रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत.


    Click to access CamScanner-06-27-2020-14.52.13_1.pdf

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.