पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रही कोरोना विषाणुचा सामना करत आहे. या संसंर्गजन्य विषाणुवर मात करण्यासाठी पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल हे गेल्या तीन महिन्यांपासुन कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी कोविड – १९ सेंटर म्हणून प्रशासनाने ताब्यात घेतले होते. परंतु प्रशासनातर्फे पुरविण्यात येणार सुविधा देण्यात येत नसल्याने व काही असंतुष्ट महाभाव हे हाॅस्पिटल बद्दल जनतेसमोर चुकीची माहिती देऊन बदनामी करत आहे. व प्रशासनाची दिशाभुल करण्याचे काम करित आहे. यामुळे डॉ. भुषण मगर यांनी दि. २७ जुन रोजी पत्रकार परिषद घेत सदरील कोविड – १९ सेंटर हे येत्या ३ जुलै पासुन पुर्णतः बंद करण्याचे सांगितले आहे.
या तीन महिन्याच्या काळात विघ्नहर्ता हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी व सर्वच टिमने कोरोना संसंर्ग झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा देत अनेक रुग्णांना या भयावह आजारापासुन मुक्तता दिली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यापासून विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भुषण मगर दिवस – रात्र रुग्णांची सेवा करीत आहेत व आपल्या परीवारा पासुन कुटुंबापासुन दुर राहुन सेवा देत आहे.
भडगाव रोड वरील हॉटेल्स स्वप्नशिल्प याठिकाणी वास्तव करत आहे फक्त रुग्णसेवा हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन सेवा करत आहे. दि. ३ जुलै २०२० पासून पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविंड सेंटर बंद होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ.भुषण मगर यांनी दिली आहे.