जरंडी,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
येथून जवळच असलेल्या गलवाडा(ता.सोयगाव) गावात महावितरणच्या पथकाने रविवारी वाॅशआउट मोहीम राबवीत गावातील वीज पुरवठ्याचे सर्व अडचणी सोडवून गावाला खंडित वीज पुरवठ्यापासून मुक्त करण्यावर जोर देत गावातील तब्बल ७० वीज चोरांचे वीज चोरीचे आकोडे व साहित्य काढून घेत जनजागृती करून अख्ख्या गावाला वीज चोरी करण्यापासून परावृत्त करत या साहित्याची ग्रामपंचायत कार्यालयासमोर महावितरणच्या पथकाने होळी केली.
गलवाडा(ता.सोयगाव)गावात वीज पुरवठ्याचे मोठ्या अडचणीचा डोंगर निर्माण झाला होता.या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांच्यासह पथकाने रविवारी गलवाडा गाव गाठून या गावातील रोहित्रे जळणे,वीज तार तुटणे,फेज कट होणे आदि अडचणींवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली असता वीज चोरीचे प्रकार समोर आल्याने महावितरणच्या पथकाने हे वीज चोरीचे साहित्य जप्त करून ग्रामस्थांची जनजागृती करून या साहित्याची ग्रामपंचायतीसमोर होळी केली,गावातील वीज पुरवठ्याच्या अडचणी तूर्तास दूर करण्यासाठी सहायक अभियंता अभिजित गौर,पप्पू पाटील,विष्णू लाड,जनार्दन जोहरे,आदींच्या पथकाने वीज चोरीच्या साहित्याची होळी केली यावेळी सरपंच सुरेखा तायडे,भारत तायडे,ईश्वर इंगळे आदींनी याकामी पुढाकार घेतला होता.