सोयगाव दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पावसाचा खंड आणि त्यातच कपाशी पिकांवर अचानक पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव झाल्याचे रविवारी घोसला ता.सोयगाव शिवारात उघडकीस आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून या पिवळ्या रंगाच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकांची हिरवीगार असलेली पाने मात्र पिवळी पडली असून पावसाचा अभाव आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.मात्र या पिवळ्या रंगाच्या प्रादुर्भावाचे रहस्य अद्यापही उलगडलेले नासाक्ल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कपाशी लागवडीसाठी जरंडी परिसर माहेरघर आहे,या परिसरात ठिबक सिंचन आणि कोरडवाहू या दोन्ही प्रकारात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे.मात्र अचानक घोसला शिवारात कोरडवाहू कपाशी पिकांची पाने अचानक पिवळी पडून पिकांनी माना टाकल्या असल्याचा प्रकार उघडकीस आला असून ठिबक सिंचनवरील लागवडी क्षेत्रात हा प्रकार आढळून आलेला नाही.त्यामुळे कपाशीचे कोरडवाहू क्षेत्र पावसाअभावी धोक्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या भागात आठवड्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असून आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे.मृग नक्षत्रात जरंडी मंडळात झालेल्या अतिवृष्टी नंतर एकही समाधानकारक पावूस या मंडळात झालेला नाही.त्यामुळे आधीच पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या हंगामावर गडद संकट कोसळले असतांना कपाशी पिकांची पाने अचानक पिवळी पडणे आय नवीन संकटाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
या आधी शेतकऱ्यांनी अति पावसाने कपाशी पिके लालसर पडून त्यावर लाल्यारोग हा प्रकार शेतकऱ्यांनी ऐकला आहे.त्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून अनुदानही देण्यात आले आहे.परंतु पावूस नसल्याने कपाशी पिकांची पाने पिवळी पडणे हा नवीनच प्रकार शेतकऱ्यांच्या समोर येवून उभा राहिला असून यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी तालुका कृषी विभागाकडून मात्र कोणत्याही उपाय योजना हाती घेण्यात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची धडकी पुन्हा वाढली आहे. |
---|