देशाच्या राष्ट्रपतींना बीड काँग्रेसचे निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
केंद्र सरकारने अन्यायी इंधन दरवाढ तात्काळ रद्द करून देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी देशाच्या राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत सोमवार,दिनांक 29 जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जून पासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करून सामान्य जनतेला लुटत आहे.देश गंभीर संकटाचा सामना करीत असताना मोदी सरकार इंधन दरवाढ करून नफेखोरी करत आहे.अन्यायी इंधन दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी याबाबत आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देत आहोत.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करून सामान्य जनतेला लुटत आहे.एकीकडे देश गंभीर संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे माञ मोदी सरकार हे अन्यायी इंधन दरवाढ करून नफेखोरी करत आहे.याविरोधात काँग्रेस पक्ष आज राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी,राष्ट्रीय नेते राहूल गांधी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार,दिनांक 29 जून रोजी राज्यासह बीड जिल्ह्यात इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणी करीता आपल्याकडे इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन करीत आहे.आज संपुर्ण बीड जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी जनता,कार्यकर्ते व जनतेच्या वतीने शासननिर्देशांचे व कायद्याचे पालन करून, फिजीकल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून हे निवेदन देत आहोत.दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रूपये तर डिझेल ११.०१ रूपयांनी वाढले आहे.त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७-८८ रूपये मोजावे लागत आहेत.दिल्ली मध्ये तर डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे.ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल १००/- रूपये लिटर होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही.कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत,उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत.त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे.याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी २९ जूनला आम्ही इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सदरील निवेदनाद्वारे केली आहे.माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती १६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या असतानाही त्याचा बोजा सामान्यांवर पडणार नाही.याची काळजी घेत इंधनाचे दर स्थिर ठेवले होते.२०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रूपये तर डिझेलवर ३.५६ रूपये होते.केंद्रातील भाजप सरकारने हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रूपये तर डिझेल ३१.८३ रूपयांपर्यंत वाढवले आहेत.त्यामुळे इंधन दरवाढ करून सुरू असलेली नफेखोरी बंद करावी व ही अन्यायकारक भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.अन्यथा याप्रश्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काळात फिजीकल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल.याची केंद्रातील भाजपा सरकारने नोंद घ्यावी असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात
आला आहे.निवेदनावर राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस
कमिटी.),काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष
महादेव आदमाने,बीड जिल्हा पतसंस्था
फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष कचरूलाल सारडा,माजी नगरसेवक सुनील वाघाळकर,माजी नगरसेवक खालेद चाऊस,रणजित पवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
प्रशासनाची विनंती ; शासन निर्देश पाळला
अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात बीड येथे सोमवारी 29 जून रोजी होणारे काँग्रेसचे धरणे आंदोलन हे
जिल्हा प्रशासनाने केलेली विनंती आणि कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर तसेच संचारबंदीचे शासन निर्देश पाळत रद्द करण्यात आले.केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दरात केलेल्या अन्यायकारक इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.शेतकरी व कष्टकरी समाजाला या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसू लागला आहे.इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढली आहे.या अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार,दि.29 जून रोजी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.तसेच याच दिवशी सोशल मिडियातून ‘स्पीक अप ऑन पेट्रोलियम प्रायसेस’ ही ऑनलाईन मोहिम चालविली जाणार आहे.या मोहिमेत काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी जनतेने मोेठ्या संख्येने सहभागी होवून केंद्र सरकारला जाब विचारावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.