सोयगाव,दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
औरंगाबादेतील कोरोना संसर्गाच्या मृत्यू आणि बाधित रुग्णांच्या संदर्भात दिव्य मराठी या दैनिकाने टाकलेला प्रकाश याबाबत जिल्हा प्रशासन आणि शासन यांच्यात मोठा कलह झाल्याने प्रशासनाच्या वतीने या दैनिकाच्या संपादक यांच्यासह प्रकाशक आणि वार्ताहर यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.हा प्रकार माध्यमांच्या स्वतंत्रतेचा गळा घोटण्याचा प्रकार असून याबाबत सोमवारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनाच्या वतीने शासनाच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करत याबाबत संबंधिताविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सोमवारी नायब तहसीलदार मकसूद शेख यांना निवेदन देवून करण्यात आली. माध्यमांच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न करणाऱ्या या शासनाच्या विरोधात सोयगाव तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करून याबाबत तातडीने गुन्हे मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे मराठवाडा संघटक आप्पा वाघ,तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे,उपाध्यक्ष शेख गुलाब,बाळू शिंदे,तालुका सचिव संदीप इंगळे,राजू दुतोंडे,एकनाथ गव्हांडे,दिव्य मराठीचे तालुका पत्रकार भरत पगारे,ईश्वर इंगळे,आदींची उपस्थिती होती.