जरंडी,ता.२९:आठवडा विशेष टीम―
घोसला(ता.सोयगाव)परिसराला सोमवारी सायंकाळी पावसाने चांगलाच झोडपा दिल्याने खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून घोसला परिसरात तब्बल ९ गावांना चांगला पावूस झाला आहे.मात्र जरंडी परिसराला या पावसाने हुलकावणी दिली असून जरंडी परिसर अद्यापही कोरडाठाक आहे.त्यामुळे एकाच मंडळात असलेल्या घोसला परिसरातील काही गावांना मात्र दमदार पावूस झाला असल्याचे वृत्त सायंकाळी उशिरा हाती आले आहे.
घोसला,निमखेडी,उमरविहीरे,वडगाव(कडे)आदि गावांना सोमवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली असून जरंडी परिसरात मात्र पावसाचा थेंब नव्हता त्यामुळे जरंडी भागात खरिपाच्या पिकांना अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.मात्र घोसला भागात झालेल्या दमदार पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहे.