बीड:आठवडा विशेष टीम― मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणारी दुष्काळ जन्य परिस्थिती या सर्व बाबीचा विचार करुन चाळक परिवाराच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा या गोष्टीला अनुसरून बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे चाळक परिवाराकडून जिरेवाडीत वृक्षारोपण करण्यात आले आपल्याला दिसून येते कि दिवसेदिवस झाडे कमी होत चालली आहेत आणि झाडे कमी होत चालल्या मुळे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत त्यामुळे आपण आत्ताच सावरून जगायला हवे आणि वृक्षारोपण जास्तीजास्त करण्याचा प्रयत्न करायला हवा कारण झाडामुळेच आपण जिवंत आहोत झाडाचा उपयोग काय आहे सर्वाना माहीती आहे असे ही यावेळी चाळक परिवाराच्या वतीने सागण्यात आले
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चाळक परिवाराकडून जिरेवाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला यावेळी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर एक वृक्ष लागवड करावे असे आवाहन चाळक परिवाराच्या वतीने करण्यात आले.