डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते मोंढा रोड दुरावस्था, निवडणूक आली की व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवणारे, नंतर मात्र व्यापाऱ्यांनाच मुलभूत सुविधा देत नाहीत― डॉ.गणेश ढवळे
बीड दि.३०:आठवडा विशेष टीम― नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी व्हायचं म्हणलं की अगोदर शेठजी दोस्त कंपनी जवळ करावी लागते, त्यांच्याकडून निवडणूकपुर्व पैसा देणगीच्या नावाखाली जमा करून निवडुन आल्यानंतर त्यांना लाभ मिळवुन द्यायचा.हा झाला सरळ सरळ व्यवहार परंतु बीड शहरातील मोंढ्यात व्यापार करणारी व्यापारी मंडळी मात्र कुठल्या मजबुरीने अकार्यक्षम शेतकरयांना निवडून देत असेल हा सुद्धा बीडकरांना फडलेला प्रश्न आहे.
शेतीउपयोगी सामुग्रींची होलसेल दुकाने मोंढ्यातच–
ऐरवी मोंढ्यातून जायचं म्हणलं तरी कमीतकमी १ किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागतो. अशातच सध्या पावसाळा,शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक बि-बियाणे,खते , या सर्व शेतीपयोगी वस्तू होलसेल भावात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मोंढा.
मोठमोठाले खड्डे केवळ वाहनच नव्हे माणसांची हाडे सुद्धा खिळखिळी होतात―वाहनचालक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते खंडेश्वरी कडे जाणारा मोंढ्यातील रस्त्यावरून मालट्रक वाहनांची सारखी रेलचेल असते. सध्या पेरणीच्या हंगामात गर्दि वाढलेली आहे. परंतु नगरपालिकेचं नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात नगरपालिका निवडणुकीत आपल्याला रस्ता,वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत त्यांना दारात उभा करायचे कि नाही हे व्यापा-यांनीच ठरवायचे आहे.