पाटोदा:गणेश शेवाळे― लॉक डाऊनचा वेळ व्यर्थ न दवडता अव्यक्त शब्दसिंधू समूहाने अनेक साहित्यिक उपक्रम राबविले आहेत.त्यापैकी एक म्हणजे लेखणीचा शब्दोत्सव या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज कवींनी सहभाग नोंदवून समूहाचा आलेख उंचावला.
संपूर्ण महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून तळागाळातून अनेक कविता डोकावूं लागल्या . अगदी थोड्याच कालावधीत या समूहाने अनेक नवोदित आणि दिग्गज कवींना सोबत घेऊन साहित्यिकांच्या चळवळीत आपले स्थान निर्माण करून दाखवले आहे ही स्पर्धा 23/5/2020 रोजी ऑनलाईन कव्यास्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री.अनंत विठ्ठल राऊत आणि अव्यक्त शब्दसिंधू या साहित्यिक समूहाचे संयोजक अध्यक्ष डॉक्टर मनोज शंकरराव सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली.अनपेक्षितरित्या संपूर्ण राज्यातून जवळजवळ २५८ कवींनी सहभाग नोंदविला असून त्यातून पाहिले पाच विजेते घोषित केले. प्रथम क्रमांक कवी सचिन बेंडबर यांचा आला यांनी “सरं आभाळ फाटलं”ही कविता सादर केली,दुसरा क्रमांक कवियत्री अनुसया पोतदार यांचा असून यांनी “होळी ” ही कविता सादर केली,तृतीय क्रमांक कवी विशाल कांबळे यांचा आहे. यानी “वर्तुळ” कविता दिली होती आणि “साज रंगाचा”या कविते सोबत कवी विट्ठल सोडणवर हे ही तिसरे आले आहेत.चतुर्थ क्रमांक “होळी”या कवितेला मिळाला असून याचे लेखक कवियत्री दिपली गडदे या आहेत,या स्पर्धेत पाचवे स्थान “प्रकाशाचे देवदूत”या कवितेचा असून कवी महेश होनमाने यांचा आहे.सर्व विजेत्यांचे संयोजक कमिटीच्या वतीने अभिनंदन करून सर्व सहभागी कवींना ऑनलाईन प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले तसेच विजेत्यांना सन्मान पत्र देण्यात आले.
अशा प्रकारे राज्यस्तरीय राबविण्यात आलेली ही ऑनलाईन काव्यास्पर्धा नवोदित साहित्यिकांसाठी मोलाची संधी होती तसेच अशा उपक्रमाचे सातत्य राखल्यास अव्यक्त शब्दसिधू हा समूह या सर्वांसाठी मोलाचे आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देईल यात शंका नाही तर अजुन नव नविन उपक्रम”अव्यक्त शब्दसिंधु राबवनारच असा शब्द या समुहाच्या अध्यक्ष डॉक्टर मनोज शंकरराव सूर्यवंशी यांनी दिला आहे.