पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील शासकीय कार्यालयात अधिकारी येत नाही म्हणून याआधी आंदोलन झाले मात्र अधिकारी व कर्मचारी माञ कार्यालयात उपस्थित राहत नाहीत शासनाने ही कर्मचाऱ्यांवरचा कामकाजाचा तान कमी व्हावा म्हणून पाच दिवसाचा आठवडा केला तरी पाटोद्यात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक 29 /06/2020 रोजी दुपारचे १२ वाजले तरी पाटोदा तहसिल तसेच सार्वजनिक बांधकाम,पंचायत समिती,कृषी कार्यालय,सामाजिक वनिकरण, लघु पाठबंधारे कार्यालयात अधिकाऱ्यांसह काही कर्मचारी उपस्थित नव्हते आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती तर इतर वारी काय असणार व सर्व सामान्य लोकांचे काम कसे होणार असा मोठा प्रश्न पाटोदाकरांना पडला असून आमदार बाळासाहेब आजबे यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना करून ही कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहात नाही मग अशा काम चुकार अधिकाऱ्यांनवर कारवाई कोण करणार ? असा प्रश्न पडत आहे.