बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

सोयगाव तालुक्याला पिककर्जाचे उद्दिष्ट्य प्राप्त ,३६ सेवासंस्था देणार शेतकऱ्यांना पीककर्ज

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
नैसर्गिक संकटात अडकलेल्या सोयगाव तालुक्याच्या निम्म्याभागात दुबार पेरण्यांचे संकट ओढवले असल्याने जिल्ह्यात तातडीने सोयगाव तालुक्यासाठी नवीन सभासद शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याच्या सूचना दिल्या असून जिल्हा बँकांच्या वतीने नवीन सभासदांना वितरण करण्यात येणाऱ्या यंदाच्या खरीप हंगाम २०२०-२१ साठी २७ कोटी सहा लाख ६८ हजार इतके उद्दिष्ट्य सोयगावसाठी प्राप्त झाले आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यातील सेवासंस्थांच्या नवीन सभासद असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेनंतर सोयगाव तालुक्याला नवीन हंगामासाठी पिक कर्जाचे उद्दिष्ट्य प्राप्त झालेले आहे.यासाठी जिल्हा बँकांनी तातडीने नवीन सभासद असलेल्या व पिक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून तातडीने कर्ज वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांनी दिल्या आहे.कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या ३६४८ शेतकऱ्यांपैकी ७३५ शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या वतीने ३ कोटी ३४ लक्ष रु इतकी कर्ज वितरण केल आहे.सोयगाव तालुक्यात कर्जमाफी योजनेतील पात्र आणि नियमित भरणा करणाऱ्या अशा १८१६ शेतकऱ्यांना आठ कोटी,८६ हजार इतकी रक्कम पिक कर्जापोटी ३६ सेवासंस्थान्मधून वितरीत करण्यात आली असून त्यापैकी ७३५ कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना माफीचा लाभ देवून ३ कोटी,३४ लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.त्यानंतर पुन्हा नवीन सभासदांसाठी पिककर्जाचे २७ कोटी सहा लक्ष इतके नवीन तातडीचे उद्दिष्ट्य जिल्हा बँकांना प्राप्त झाले असून तीस सप्टेंबर २०२० वाटपाची डेडलाईन देण्यात आली आहे.नवीन सभासदांना कर्ज वितरण करण्यासाठी सहकार अधिकारी श्रेणी-१ दिलीप जैस्वाल,तालुका कर्जवितरण अधिकारी राजेंद्र काळे,गटसचिव दिलीप रावणे,आदी हि प्रक्रिया राबविण्यासती शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यात सोयगाव आणि सावळदबारा या दोन्ही मंडळात पावसाची मोठी ओढ निर्माण झाली आहे.त्यामुळे या दोन्ही मंडळातील खरिपाच्या पिकांना ताण पडल्याने सोयगाव आणि सावळदबारा या मंडळात दुबार पेरण्यांचे संकट ओढवल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सोयगाव तालुक्याला तातडीने नवीन सभासदांना खरिपाच्या हंगामात संकटातून काढण्यासाठी उद्दिष्ट्य दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *