सोयगाव,दि.३०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या काळातील बंद असलेली एस.टी.ची सेवा लॉकडाऊन-६ मध्येही जिल्हाबंदीचा निर्णय कायम राहिल्याने एस.टी.ची सेवा मात्र बंदच राहणार असून मार्च महिन्यापासून बंद असलेली बससेवा जुलै मध्येही बंद राहील असे संकेत मंगळवारी मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या परिवहनचं बसेस लॉकडाऊन-६ मध्येही जिल्हाबंदीच्या निर्णयामुळे बंदच राहणार आहे.त्यामुळे एस.टी.ची सेवा तालुकाअंतर्गत चालू ठेवून उत्पन्न मिळणाऱ्या रस्त्यांवरच बससेवा चालू ठेवावी अन्यथा बंदच ठेवा असे स्पष्ट आदेश मंगळवारी परिवहन विभागाकडून काढण्यात आले आहे.कोरोना संसर्गाच्या कालावधीत बंद करण्यात आलेल्या एस,टी.ची पुन्हा भरारी व्हावी यासाठी मागील महिन्यात जिल्ह्यातील आगारांच्या तालुकाअंतर्गत सेवा चालू करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु या फेऱ्या तोट्यात गेल्याने पुन्हा तोट्यात गेलेल्या फेऱ्या बंद काढण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतु तोट्याच्या बाहेर असलेली सेवाही बरोबरी साधत असल्याने त्याही बंद करण्यात येवून परिवहनचं एस.टी.ने शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु या योजनेलाही जिल्ह्यात प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस परिवहनची एस.टी आगारातच उभी राहिली होती.या एस.टी.ला प्रतीक्षा होती लॉकडाऊन-६ ची परंतू या लॉकडाऊन-६ मध्येही जिल्हाबंदीचा निर्णय कायम करण्यात आल्याने एस.टी,ची प्रतीक्षा संपली असून एस.टी वाट खडतर झाली आहे.
उत्पन्न असलेल्या रस्त्यावरच फेऱ्या सुरु करा-
तालुकाअंतर्गत एस.टी बससेवा उत्पन्न असलेल्या रस्त्यांवरच सुरु ठेवा असे स्पष्ट आदेश मंगळवारी काढण्यात आल्याने जिल्ह्यातील आगार प्रमुखांना आता उत्पन्न देणारे रस्ते शोधण्याची वेळ आली असून यापूर्वी मागील महिन्यात सुरु करण्यात आलेल्या बस फेऱ्या तोट्यात गेल्याने जिल्ह्यातील आगारांचा इंधन साठा खर्च करून बसला आहे.