परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

परळी शहर काँग्रेसचे आंदोलन धुमधडाक्यात यशस्वी― बाबुभाई नंबरदार

परळी दि.३०:आठवडा विशेष टीम पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालय समोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारने इंधन दरवाढ पेट्रोल-डिझेलची केल्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण वाढला असून पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांनी धरणे आंदोलनात केली आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बी बियाणे खते औषधी खूप मोठ्या प्रमाणावर राज आश्रयाने अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आहेत ते निकृष्ट असून बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

महाराष्ट्र सरकार कोरोना रोगाच्या लॉक डाउन मध्ये स्वस्त धान्य दुकान दारांना मोफत धान्य वाटप गोरगरीब जनतेला करण्यासाठी शासनाकडून दिले परंतु ते नियमाप्रमाणे जनतेपर्यंत पोहोचले नाही. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसे निवेदन मा तहसीलदार परळी वैजनाथ जिल्हा बीड मार्फत मा राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत अप्पा कोरे जीएस सौंदळे तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबू नंबरदार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ तालुका अध्यक्ष महिला सुनिता मुंडे शहराध्यक्ष महिला आशा कोरे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक जावेद भाई शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक शेख सिकंदर किसान काँग्रेस लहू दास तांदळे शेख जावेद युवक काँग्रेस शेख जहीर उपाध्यक्ष सुदाम लोखंडे गुलाब देवकर बाबुराव इंदुरकर गोपीनाथ जाधव शेख आसिफ गुड्डू राम घाटे सुदाम लोखंडे पांडुरंग सदरे सय्यद जाफर जब्बर शेठ शेख शारीरिक महादेव रोडे शेख सिकंदर महादेव तर कसे प्रकाश मुंडे अमर देशमुख सूर्यवंशी सुधाकर गोविंद मस्के दगडोबा कराड भागवत ढाकणे बाबुराव इंदुरकर रामलिंग नावंदे राहुल भोकरे फारुख भाई मोबीन अन्सारी मोसिन खान पठाण अमोल चिगरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड तर आभार प्रदर्शन सय्यद आलताप यांनी केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.