कुडाळ/सिंधुदुर्ग:आठवडा विशेष टीम― मा .सुप्रियाताई सुळे संसदरत्न खासदार, महिलांचा बुलंद आवाज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरणीय ताईचा आज वाढदिवस त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रेवतीताई राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील माणगाव मधील आशसेविक व स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार काजू, आंबा,सोनचाफ्याची रोपे देऊन सत्कार खरेदी विक्री संघ माणगाव येथे करण्यात आला.यावेळी रेवती राणे म्हणल्या आज कोरोंना च्या काळात आपण जीवाची ढाल करून गावात काम करत आहात अश्या वेळी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी म्हणून आज आपण एकत्र जमलो झाड देण्याचं कारण म्हणजे जसे झाड मोठं झाल्यावर सावली देते तसे आमच्या ताई आपल्या बरोबर तुमच्या संकट काळात सावली बनून तुमच्या पाठीशी आम्ही आमचा पक्ष तुमच्या पाठीमागे उभा राहील .यावेळी कुडाळ महिला अध्यक्ष पूजा पेडणेकर, नम्रता सावंत,शुभागी साटम, कुडाळ माजी उप सभापती आर. के सावंत ,संदीप राणे, मनोहर साटम,सर्वोदय पतसंस्था संचालक संदेश राणे , मिनानाथ वारंग,विजया राजन परब वडोस, ज्योती सावंत,अक्षता राऊळ, सारिका धुरी, उपस्थित होते.