क्राईमपरळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

निकिता जगतकर आत्महत्या प्रकरण...आरोपीला अटक, ऍट्रोसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

कु. निकिता जगतकरच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून 4 लाख 12 हजार 500 रुपयांची मदत सुपूर्द

धनंजय मुंडेंनी न्याय मिळवून देण्याचे दिले होते आश्वासन

परळी दि.०१:आठवडा विशेष टीम― कु निकिता जगतकर आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जगतकर कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेअंतर्गत 4 लाख 12 हजार 500 रुपये आर्थिक मदत करण्यात आली.

या मदतीचा धनादेश जि. प. गटनेते अजय मुंडे व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते जगतकर कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला यावेळी रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. विनोद जगतकर, दत्ता सावंत, अनंत इंगळे, रवी मुळे, नितीन रोडे, केशव गायकवाड, अमर रोडे, किशोर चोपडे, राज जगतकर, दिनेश वाघमारे, निलेश वाघ, सुयोग अवचारे, माधवराव ताटे, सोपान ताटे, भगवान साकसमुद्रे,बापू गायकवाड, किशोर चोपडे, श्यामसुंदर दासूद, सोपान रोडे, स्वप्नील साळवे, राजन वाघमारे,सुभाष वाघमारे,धम्मा अवचारे संपादक बालासाहेब जगतकर आदी उपस्थित होते.

ना. मुंडे यांनी क्वारंटाईन असताना या प्रकरणाची दखल घेत जगतकर कुटुंबियांचे फोनवरून सांत्वन करत त्यांना आर्थिक मदत व निकिताला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

संबंधित प्रकरणी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचनाही ना.मुंडे यांनी पोलीसांना दिल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनेनुसार निकिताच्या कुटुंबियांना पहिल्या टप्प्यात 4 लाख 12 हजार 500 रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून, योजनेनुसार आणखी इतकीच रक्कम या प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.