परळी प्रतिनिधी दि.16: राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या प्ररेणेने परळी शहरातील शिवाजीनगर भागातील श्री संत भगवानबाबा संस्थान मध्ये 17 जानेवारी पासुन अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. या सप्ताहाची सांगता दि.24 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच या सप्ताहात दररोज काकडा आरती श्री विष्णुसहस्त्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, धुपआरती व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य अमोल महाराज परळीकर हे आहेत. तर ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख ह.भ.प.बप्पाजी महाराज जिरेवाडीकर हे आहेत. कलशपुजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गाथा पुजन भास्कर मामा चाटे, ग्रंथपुजा अजय मुंडे, विनापुजा सरोजनी हालगे, मृदंगपुजा निळकंठ चाटे, टाळ पुजन दत्तात्रय गुट्टे, प्रकाशराव मुंडे, ज्ञानेश्वर पुजन गोविंद बालासाहेब मुंडे, महादेव दहिफळेे, अॅड. प्रेमनाथ मुंडे, बालासाहेब गित्ते, संजय आघाव, डॉ.नामदेव आघाव, किशोर पारधे यांच्या हस्ते करण्यात आले. भजन नेतृत्व निर्गुण महाराज उंडेगावकर हे करणार आहेत. या सप्ताहात भागवताचार्य गणेशानंद महाराज शास्त्री, भागवताचार्य विजयानंद महाराज आघाव, भागवताचार्य वसुदेव महाराज शास्त्री गोपीनाथगड, भागवताचार्य शंकर महाराज चिंचकर आळंदी देवाची, रामायणाचार्य भरत महाराज गुट्टे, रामायणाचार्य संतोष महाराज वनवे, ज्ञानेशभक्त अर्जुन महाराज लाड (गुरुजी), वैराग्यमुर्ती प्रभाकर महाराज झोलकर यांचे किर्तन होणार आहेत. काल्याचे किर्तन भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचे किर्तन 12 ते 2 होणार आहेत. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक दत्तभक्त विनायक महाराज चाटे हे आहेत. या सप्ताहाचा परळी परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा संस्थान शिवाजीनगर परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
0