सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई तर्फे दिला जाणारा ‘आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल साहित्यरत्न पुरस्कार’ गोंदेगाव येथील भूमिपुत्र चि.आकाश दिपक महालपूरे यांना जाहीर करण्यात आला आहे.ट्रस्टचे अध्यक्ष मा.कृष्णाजी जगदाळे यांनी आज या पुरस्काराची अधीकृतपणे घोषणा केली.दरम्यान कोरोनाची परिस्थीती आवाक्यात आल्यानंतर या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.अन्यथा समितीच्या वतीने आकाश महालपूरे यांना त्यांच्या घरपोच हा पुरस्कार पाठवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई तर्फे दरवर्षी समाजप्रबोधन,साहित्य,
कला,क्रिडा,संस्कृती,विज्ञान,संगीत आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तीस वा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
“यंदा सन २०२० साठी देण्यात येणारा हा पुरस्कार”..!
आकाश महालपूरे यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांना जाहीर झाला आहे.हरवलेल्या पत्रातील मायेचा ओलावा आपल्या लिखाणातून जिवंत करण्यासाठी ते प्रसिद्ध साहित्यीक आहे.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.