अंबाजोगाई तालुका

शिवजागर प्रतिष्ठाणच्या आदर्श राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कारांचे वितरण

आई-वडिलांना डस्टबीन समजू नका-अर्जुनराव जाहेर पाटील

अंबाजोगाई :मात्या-पित्यांचा महिमा व शक्ती मोठी आहे.ती समाजाने ओळखावी. जिजाऊ,शिवरायांचे नांव घेणारांनी आई- वडिलांची सेवा करावी, सांभाळ करावा,त्यांना सन्मान द्यावा, सुसंस्कृतपणा जपावा, आरक्षणाने सर्वांनाच नौक-या मिळणार नाहीत तेव्हा मराठा तरूणांनी स्वता:चा उद्योग-व्यवसाय करावा, अंबाजोगाईत खर्‍या अर्थाने स्त्रि शक्तीचा गौरव करून समाजाला दिशा देण्याचे काम शिवजागर प्रतिष्ठाणने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँ साहेब पुरस्कार सोहळ्यातून केले आहे. कुटूंब एकञच ठेवा, कृपया जन्मदात्या आई-वडिलांना ओझे किंवा डस्टबीन समजू नका असे कळकळीचे आवाहन अर्जुनराव जाहेर पाटील यांनी केले.ते अंबाजोगाईत आदर्श राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार,दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता नगरपरिषदेच्या आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात झालेे.शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासुन राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने कष्टातून, संघर्षातून कुटुंबाची व मुला-मुलींची जडण-घडण करणा-या आदर्श मातांचा शोध घेवून त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कार वितरण उपक्रमाचे हे 17 वे वर्ष आहे.यावर्षीही शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँ साहेब पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावर्षी आदर्श माता जिजाऊ माँ साहेब पुरस्कारासाठी सौ.मंदाकिनीताई महादेव जाधव (पुणे),
सौ.शारदाताई बालासाहेब आवारे (पाटोदा),सौ.सिंधुताई वसंतराव केदार (एकुरगा),
सौ.अनिताताई अर्जुनराव थोरात (पांगरी),सौ.सुनंदाताई अण्णासाहेब लोमटे (अंबाजोगाई), सौ.लिलाताई प्रतापराव सुर्वे (इंदापुर,जि.पुणे), सौ.पार्वतीताई हणुमंतराव हुडे (उदगीर),सौ.
प्रभावतीताई काशिनाथराव कांबळे (चिंचोलीमाळी),श्रीमती हरिबाई विठोबा सोनवणे (आनंदगाव सारणी),सौ.सिंधुताई दिगंबरराव पुजारी (पुस) या दहा मातांना शाल, साडी-चोळी, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.राजर्षी शाहु बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील (बीड) तर विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द स्ञिरोगतज्ञ डॉ.सुरेखाताई काळे (शिवाई प्रतिष्ठान, लातूर),माजी आ.
पृथ्विराज साठे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,नगराध्यक्ष सौ.रचनाताई सुरेश मोदी,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे (बीड),
ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा,बीड जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक बबनराव लोमटे हे मान्यवर तसेच
शिवजागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे,दाजिसाहेब लोमटे (सहसचिव)
यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे (बीड) यांना कै.नागोराव काशिनाथराव लोमटे (नवाब) स्मृती पुरस्कार- 2019 ने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह,शाल आणि पुष्पगुच्छ असे होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दिपप्रज्ज्वलन करण्यात आले.त्यानंतर पुलवामा घटनेतील शहीद जवानांना सभागृहाने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या प्रसंगी बोलताना सुप्रसिध्द स्ञिरोगतज्ञ डॉ.सुरेखाताई काळे यांनी स्ञियांनी घराबाहेर पडून स्वता:चे कर्तृत्व सिध्द करावे, आईला जात-धर्म नसतो तर तिचे कर्तृत्व,त्याग पहा,आई हा कुटूंबाच्या पाठीचा कणा तर घराचा आधारस्तंभ असते, कुटूंबाच्या प्रगतीत स्ञियांचे योगदान मोठे असते ते ओळखा. पालकांनी पाल्यांवर योग्य संस्कार करावेत, एकञ कुटूंब हे आदर्श
कुटूंब असते तेव्हा आपले कुटूंब एकञच कसे राहील याचा प्रयत्न करा असा मौलीक विचार डॉ.काळे यांनी यावेळी मांडला.तर रमेशराव पोकळे (बीड) यांनी सत्काराला उत्तर देताना मराठा महासंघाचे नागोराव पापा लोमटेंमुळे मी घडलो.आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळाल्याने आपण भाग्यवान आहोत.हा पुरस्कार आपण नम्रपणे स्विकारत आहोत. पापांनी अनेक आमदार, कार्यकर्ते घडविले असल्याचे सांगुन त्यांच्या प्रेरणेनेच आज सामाजिक,राजकिय, सहकार व शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यात सक्रिय काम करीत असल्याचे नमुद केले.याप्रसंगी पुरस्कार प्राप्त आदर्श माता सौ.सुनंदाताई लोमटे,सौ.लिलाताई सुर्वे तसेच आदर्श मातांच्या वतीने सचिन थोरात यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना अमृतराव टेकाळे यांनी परस्थितीवर मात करून कुटुंबासाठी व मुलांसाठी राबणार्‍या,
मुलांना उच्च विद्याविभूषीत करतात त्या आईचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली 16 वर्ष सुरू आहे. हे या उपक्रमाचे 17 वे वर्षे आहे.गेल्या 16 वर्षांत 150 हुन अधिक मातांचा सन्मान करता आला.हे सांगुन हा उपक्रम अखंड सुरू रहावा याकरीता बळ द्या,सदिच्छा कायम ठेवा
अशी अपेक्षा अमृतराव टेकाळे यांनी व्यक्त केली.प्रारंभी मान्यवरांनी राजमाता जिजाऊ, छञपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापुजन,अभिवादन व दीपप्रज्ज्वलन केले. संयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे
यांनी करून उपस्थितांचे आभार श्रीरंगराव चौधरी यांनी मानले.यावेळी सुत्रसंचालिका ज्योती शिंदे,समारंभ स्थळी आकर्षक रांगोळी काढणारी साधना ठोंबरे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तर कु.अनुष्का दामोधर सोनवणे हिचा गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तत्पुर्वी प्रिया देशमुख या विद्यार्थीनीने सभागृहासमोर शिवपोवाडा सादर केला तर गायक सुभाष शेप व संचाने जिजाऊवंदना, स्वागतगीताचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित खुल्या चित्रकला रंगभरण स्पर्धेतील विजेते कु. प्राची साहेबराव जाधव (प्रथम),कु.सायली कल्याण राजेमाने (द्वितीय),कु.शरयू बालाजी पडीले (तृतीय) तर उत्तेजनार्थ शुभम अनंत लाड या विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांनी प्रोत्साहित केले.या कार्यक्रमास अॅड. अण्णासाहेब लोमटे, अॅड.किशोर गिरवलकर, संजयभाऊ दौंड, हणमंतराव मोरे, डॉ.पांडुरंग पवार,
अर्जुनराव थोरात, चंद्रकांत हजारे आदींसहीत शहर व परिसरातील पञकार, साहित्य,संगीत,शिक्षण,
क्रीडा,समाजकारण,
राजकारण,विधी,
वैद्यकिय,सहकार आदी क्षेञातील मान्यवर,
नागरिक,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवजागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे,डॉ.सुधीर देशमुख (उपाध्यक्ष), राम चव्हाण (सचिव), दाजिसाहेब लोमटे (सहसचिव),परमेश्वर भिसे (कोषाध्यक्ष), सदस्य सर्वश्री कमलाकर जाधव, अ‍ॅड.माधव जाधव, श्रीरंगराव चौधरी, अण्णासाहेब जगताप, अनंत आरसुडे,रामराव सरवदे,अ‍ॅड.संतोष पवार,जे.डी.थोरात यांनी पुढाकार घेतला.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.