बीड जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची भुजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तपासणी करावी ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन– डॉ.गणेश ढवळे | Beed District News

बीड Beed:आठवडा विशेष टीम― शासनांचा लाखोंचा खर्च, ग्रामपंचायतींची उदासीनता आणि प्रशासनाची अनास्था यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नमुने तपासले असता त्यामध्ये जिवाणुंचा संसंर्ग झाल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते, ग्रामिण भागातील ग्रांमपंचायतींना ब्लिंचिंग पावडर वापरावे असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले असले तरी कागदोपत्री ब्लिचिंग पावडरचा Bleaching Powder खर्च दाखवून शासनाची दिशाभूल करुन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा अनुभव ग्रांमस्थांना नविन नाही, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांना लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत तपासणी आवश्यक, साथीचे आजार टाळण्यासाठी

जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत होत असते. पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी व जैविक तपासणी केली असता बहुतांश पिण्याचे पाणी हे पिण्यासाठी अपात्र ठरल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने यात लक्ष घालुन पाणी नमुन्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.

शासनाचा लाखोंचा खर्च,ग्रांमपंचायतीची ऊदासीनता ,प्रशासनाची अनास्था त्यामुळे दुषित पाणी पुरवठा, यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दुष्काळी भागांमध्ये टँकरव्दारे पाणी Water Tanker पुरवठा करुन नागरीकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरीही तलावातील दूषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित किंवा अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोताचे व टँकरच्या पाण्याचे नमुने तपासले असता धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाची अनास्था , हानीकारक

जिल्ह्यात पाणी नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रयोगशाळेशिवाय परळी, माजलगाव, गेवराई , पाटोदा येथे उपविभागीय प्रयोगशाळा आहेत. आरोग्य कर्मचा-यांनी टँकर व्दारे पुरविण्यात येणा-या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे,मात्र प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे मोठा अनर्थ घडु शकतो.

ग्रामपंचायतींची उदासीनता

ग्रामिण भागातील पाणीपुरवठा Watersupply योजनांचा राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी यांच्या खाबुगिरीमुळे बट्ट्याबोळ झाला असून बहूतेक ग्रांमपंचायतीमधिल पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. जलशुद्धीकरण प्रकल्प अपुर्ण असुन कागदोपत्री चालु असल्याचे दाखवले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. आरोग्य कर्मचा-यांनी नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवणे गरजेचे आहे, वैद्यकीय अधिकारी Medical Officer यांनी या सर्व गोष्टींवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशा सुचना आरोग्य विभागाकडून दिलेल्या असतात. फक्त २०० रूपयात ५ किलो ब्लिचिंग पावडर येते. आणि १००० लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी फक्त ५ ग्रम ब्लिचिंग पावडर पुरेसी आहे. मात्र उदासिनतेमुळे काही ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याची सुद्धा तसदी घेतली नसल्याचे प्रत्यक्षात आढळुन येते.
म्हणुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी बीड जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत करण्याची मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार District Collector Rahul Rekhawar यांच्या मार्फत उद्धव ठाकरे Uddhav Thakrey, मुख्यमंत्री, गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,राजेश टोपे आरोग्य मंत्री, धनंजय मुंडे Dhananjay Munde सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदनव्दारे केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.