सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आषाढी एकादशीला बुधवारी सोयगावला दौरा करून पोलीस ठाण्याला धावती भेट देवून कोरोना संसर्गाच्या उपाय योजनांची माहिती घेतली.यावेळी शहराचे नगराध्यक्ष कैलास काळे यांनी त्यांची भेट घेवून सोयगाव पॅटर्न बाबत चर्चा केली.
सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देवून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या बंदोबस्ताचा आढावा घेत पोलीस ठाण्याच्या मोडकळीस आलेल्या इमारतीची पाहणी करून या इमारतीच्या दुरुस्यीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी नगराध्यक्ष कैलास काळे,संजय शहापूरकर,मंगेश सोहनी,सुनील ठोंबरे आदींनी त्यांची भेट घेवून उपाय योजनेच्या कल्पना सुचविल्या व चर्चा केली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना आढाव्याबाबत माहिती दिली.कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी पोलिसांनी पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील पोलीस ठाण्याच्या इमारतीची पाहणी करून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देतांना.