सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला सोयगाव परिसरातील सर्वच दर्शन स्थळे बंद असल्याने सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या मुलीने घरीच टाकाऊ वस्तूपासून घरबसल्या विठ्ठल मूर्ती तयार करून नागरिकांना घरातच आषाढी एकादशी साजरी करण्याचे आवाहन करून संदेश दिला आहे.
सृष्टी प्रवीण पांडे या मुलीने घरातील कागदाचा लगदा त्यासोबतच घरातील काही टाकाऊ वस्तू यांचा उपयोग करून लॉकडाऊन मध्ये घरबसल्या विठ्ठल मूर्ती तयार करून नागरिकांना घरीच आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन मनोमनी घेवून घरातच बसण्याचे आवाहन केले आहे.या चिमुकलीने घरीच विठ्ठल मूर्ती तयार करून आपल्या कुटुंबीयांसोबत आषाढी एकादशीचे दर्शन घडवून दिले आहे व नागरिकांना आवाहनातमक संदेश दिला आहे.