पाटोदा:आठवडा विशेष टीम― मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
मंठा येथील वैष्णवी गोरे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मंठा शहरातील बाजारपेठ आरोपी शेख अल्ताफ बाबु याने धारदार शस्त्राने गळा कापून खुन केला.पाच दिवसापुर्वी वैष्णवी गोरे हिचा विवाह झाला होता, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे गोरे कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती अठराविश्व दारिद्रय तसेच हालाकीच्या परिस्थितीशी दोन हात करत वडिलांनी वैष्णवीचा विवाह केला होता, चार दिवसापुर्वी वैष्णवीचा विवाह झाला असताना, विवाहानंतर मंठा येथे आलेल्या वैष्णवीच्या खुनातील आरोपी शेख अल्ताफ बाबु याने निर्दयीपणे धारदार शस्त्राने खुन केला. त्या आरोपीला तात्काळ भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गणेश शेवाळे यांनी केली आहे.