ब्रेकिंग न्युज

पाटोदा नगरपंचायतच्या निष्काळजीपणाने माऊली नगर मधील दोन गट आमने सामने

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा शहरातील माऊली नगर रामकृष्णनगर हे परिसर गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नागरिक सुविधापासून वंचित असून या भागातील नागरिकांना नगरपंचायत द्वारा पहिल्यापासून कोणत्याही मुलभुत सुविधा उपलब्ध झालेले नाही. सुविधा उपलब्ध केल्यास काही मंडळी स्वतःचे हीत जपून सुविधा राबवण्यास मज्जाव करत आहे याची गांभीर्याने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे सध्यातरी यासंदर्भात माऊली नगर मध्ये दोन गट आमने-सामने आले आहेत.

यासंदर्भात माहिती अशी की या भागातील नागरिकांना चालायला निट रस्ता नाही व सांडपाणीचे गटार नाही. येथील नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागत आहे. सध्या आमदार सुरेश धस यांनी माऊली नगरची परस्थिती पाहून या भागातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले होते.परंतु जे मेन रस्ता होने गरजेचे होते ते न करता आड बाजुला निधी खर्च करण्याची कारस्थान इंजिनिअर, व गुत्तेदाराने कडून करण्यात आले आहे.या रस्त्याच्या एकाच बाजूला गट्टार बनुन पुर्ण पाणी रस्त्यावर सोडण्यात आले,या गटारमध्ये संडासचे पाणी येत असल्याचे कारण सांगत एका गटाने थेट रस्त्यावर .मुरुम चा ढिगारा टाकून समोरील तीस ते चाळीस घरचा रस्ताच बंद केले आहे.या तीस ते पस्तीस घरातील नागरिक व मुरुम टाकणाऱ्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. समोरील तीस ते पस्तीस घराच्या नागरिकांनी या विषयी पाटोदा नगरपंचायत मध्ये यासंदर्भात तक्रार केली पंरतु पाटोदा नगरपंचायत मात्र यासंदर्भात ठोस निर्णय न घेता फक्त नगरपंचायत चालढकल करत आहे. पाटोदा नगरपंचायतचे मुख्यधिकारी भोसले यांनी जागेची पाहणी करून या लोकांची समस्या सोडावी म्हणून वारंवार अर्ज देऊन सुध्दा लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी पुन्हा नगरपंचायत मध्ये आपल्या परिवारासह धरने आंदोलन चा मार्ग अवलंबावा लागणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.