बीड दि.०३:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश गावातील रोहीत्रांची दुरावस्था असुन फ्यूज नसलेले, वायर जळालेली, संरक्षक दार नसलेल्या उघड्यावरील रोहिंत्रांमुळे मनुष्य अथवा हीरवागार चारा खाण्यासाठी जनावरे यांच्या जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो, याप्रकरणी २४ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते तहसिलदार किरण आंबेकर आणि तत्कालिन सचिन पुंडगे , सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनुर ठाणे यांना रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते, महावितरण लिंबागणेश चे उपविभागीय अभियंता हुरकुडे यांनी मागण्या मान्य केल्याचे सांगितले होते. त्यानंतर १० मार्च रोजी महावितरण कार्यालयाच्या आवारात विजबिलांची होळी करून बोंबाबोंब आंदोलन केले होते. परंतु ३ महीने उलटुन सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ३ जुलै रोजी निवेदन सादर करण्यासाठी लिंबागणेश येथील कार्यालयात गेलो असता अभियंता हुरकुडे गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व उपस्थित कर्मचारी यांना फुल देऊन निवेदन देण्यात आले. व १० दिवसात मागणी पुर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही महावितरणला देण्यात आला आहे.
युवराज सूरवसे , महाजनवाडी ता.जि.बीड―
महावितरणच्या अभियंत्यांनी सुरवसे-पठाण वस्ती वरील ग्रांमस्थांना १० लोकांनी मिटर घ्या तुम्हाला सिंगल फेज कनेक्शन देऊ असे सांगितले त्यानंतर कनेक्शन घेऊन दिड वर्ष झाले,सिंगल फेज कनेक्शन मिळालेच नाही, परंतु एकेकाला ४ हजार रू ते १० हजार रुपये पर्यंत विजबिल आले.
आम्ही डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर अवाजवी विज बिलाच्या निषेधार्थ लिंबागणेश येथिल महावितरणच्या कार्यालय परिसरात
दि. १० मार्च रोजी विजबिलाची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. परंतु आज ३ महिने उलटून गेले तरीही मागणी पुर्ण न झाल्याने आज डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी आंदोलन करत कर्मचारी यांना फुल देऊन निवेदन देण्यात आले.
जगताप एस ए. ,महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर–
दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कमी जास्त दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे बँकेचे सर्व्हर जळाले होते, त्यामुळे एक दिवस कामकाज ठप्प पडले होते.सध्या पिककर्ज नुतनीकरण, आदि. गोष्टीमुळे बँकेत गर्दि वाढलेली आहे,त्यातच सर्व्हर जळाल्यामुळे वशेतक-यांची गैरसोय झाली होती.
डॉ.गणेश ढवळे ,लिंबागणेश ता.जि.बीड―
यापुर्वी दि. २४ फेब्रुवारी रोजी लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन आणि दि. १० मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर विजबिलाची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. परंतु ३ महिने उलटले आहेत. मुकी जनावरे पावसाळ्यात हिरवा चारा खाण्यासाठी उघड्यावर असलेल्या रोहित्रांजवळ जातात, त्यामूळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच गावांमध्ये लोंबकळणा-या विद्युत तारा, तसेच पावसाळ्यापूर्वी तारेजवळ असणा-या झाडांच्या फांद्या साळणे आवश्यक आहे तसेच महावितरणचे कर्मचारी मुक्कामी राहात नसल्यामुळे ग्रामस्थांनाच सकाळी फ्यूज टाकावे लागते, त्यामुळे जिवीतहानी होऊ शकते.तसेच महाजनवाडी येथिल सूरवसे-पठाण वस्ती मधिल ग्रांमस्थांना सिंगल फेज कनेक्शन देण्यात यावे. अन्यथा दि. १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.