अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे पदग्रहण ; संघटन करून सामाजिक उपक्रम राबविणार –पद्माकर सेलमोकर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
आपण सर्वजण एकञ येवून कार्य करू,आपल्या सुचनांचे स्वागत आहे,अनुभव पणाला लावून सर्वांना सोबत घेवून,प्रभावी संघटन करून आणि आवश्यक तो निधी उभारून सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे नुतन अध्यक्ष पद्माकर सेलमोकर यांनी केले.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचा 7 वा पदग्रहण सोहळा बुधवार,दिनांक 1 जुलै रोजी संपन्न झाला.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे मावळते अध्यक्ष सदाशिव सोनवणे यांचे निवासस्थानी पदग्रहण सोहळा बुधवार,दिनांक 1 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.डी.एच.थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणून पञकार प्रशांत बर्दापूरकर,भागवत कांबळे,कमलताई बरूळे यांचे सहीत व्यासपिठावर माजी अध्यक्ष सदाशिव सोनवणे,श्रीरंगआबा चौधरी,नुतन अध्यक्ष पद्माकर सेलमोकर,सौ.प्रणिताताई सेलमोकर,नुतन सचिव पुरूषोत्तम वाघ,सौ.वनमालाताई वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली.प्रारंभी प्रास्ताविक करताना माजी अध्यक्ष श्रीरंगआबा चौधरी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंबाजोगाईच्या सांस्कृतिक चळवळीचा वारसा जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबविले.पर्यावरण,शिक्षण,सेंद्रिय शेती,आरोग्य शिबीर घेवून तब्बल 110 हून अधिक कार्यक्रम घेतल्याचे श्रीरंगआबा चौधरी यांनी सांगितले.तर वार्षिक अहवालाचे वाचन करताना मावळते अध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी या क्लबला सहा वर्षे पुर्ण झाल्याचे सांगून सर्वांच्या सहकार्याने चांगले कार्य घडल्याचे सोनवणे म्हणाले.गेली वर्षभर विविध लोकहिताचे, समाजउपयोगी,प्रबोधनाचे,राष्ट्रीय कार्य लोकसहभागातून केल्याची माहिती त्यांनी दिली.याप्रसंगी मान्यवरांच्या व मावळते अध्यक्ष व सचिव यांचे हस्ते कॉलर,सनद व हातोडा सोपवून नुतन अध्यक्ष रो.पद्माकर सेलमोकर व नुतन सचिव रो.पुरुषोत्तम वाघ यांना तसेच सर्व संचालक मंडळाला पद हस्तांतरण करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रांतपाल संतोष मोहिते म्हणाले की,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीने अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला.गेली वर्षभर विविध उपक्रम राबविले.अनेक पुरस्कार,मानसन्मान प्राप्त झाले.रोटरी ही मानवतावादी दृष्टीकोन ठेवून कार्य करणारी सामाजिक संघटना आहे.यात विविध घटकांचा सहभाग आहे.राष्ट्रिय एकात्मता जोपासण्याचे कार्य रोटरी करते असे प्रतिपादन प्रांतपाल संतोष मोहिते यांनी करून हरीष मोटवानी यांच्या संदेशाचे वाचन केले.याप्रसंगी भागवत कांबळे,पञकार प्रशांत बर्दापूरकर,धनराज मोरे,मनोहर कदम,जनार्धन मुंडे,संभाजीराव लांडे,कमलताई बरूळे आदींनी आपल्या मनोगतात शुभेच्छा देवून मौलिक सुचना केल्या.अध्यक्षीय समारोप डॉ.डी.एच.थोरात यांनी केला.यावेळी मान्यवरांनी नुतन पदाधिका-यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सुञसंचालन ज्योतीताई शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार नुतन सचिव पुरूषोत्तम वाघ यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नुतन अध्यक्ष पद्माकर सेलमोकर,नुतन सचिव पुरूषोत्तम वाघ,माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,माजी अध्यक्ष सदाशिव सोनवणे यांचेसह सर्व सन्माननिय रोटरी क्लब सदस्यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमास प्रतिज्ञाताई जोशी,सर्जेराव मोरे,परमेश्वर करपे,वामनराव जोशी,राजाराम पोतदार,विर्धे,विश्वनाथ गिरगिरवार,पञकार रणजित डांगे,तपसे,सुरेश बन,राहूल शिंदे यांचेसह योगेश्वरी रोटरी सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.