बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते पीकविमा संदर्भात गप्प का ?
बीड:आठवडा विशेष टीम― राज्यातील सर्व जिल्ह्यात पीकविमा स्विकारण्यास सुरू झाला असून यात बीड जिल्हास मात्र आजून कंपनीचं मिळाली नसून शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण देण्यासाठी अपयशी ठरतंय असा आरोप शिवसंग्रामचे अक्षय शिंदे यांनी केला आहे.
राज्यातील 33 जिल्ह्यामध्ये पीकविमा स्वीकारण्यास सुरू झाला आहे मात्र बीड जिल्ह्याची कंपनी मात्र निविदेत अडकली असून शेतकऱ्यांच्या हिताच सरकार मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. मागच्या रब्बी हंगामात सुद्धा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नाही आता खरीप हंगामातही बीड जिल्ह्याची कंपनी मात्र निविदेत अडकली असून राज्य सरकार बीड जिल्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. आगोदर शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून बोगस बियांनामुळे सोयाबीन उगवली नाही मागच्या वर्षी जोमाने आलेलं पीक अतिवृष्टी मूळे गेलं यावर्षी पाऊसमान चांगला होईल की नाही सांगता येत नाही त्यातच पिकावरच्या रोगराई मूळे शेतकऱ्यांच्या पदरात पीक पडेपर्यंत त्याचा काही भरवसा नसतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण राहणार. बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे चार आमदार तसेच पालकमंत्री आहेत मात्र पीकविमा संदर्भात ते गप्प का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच सरकार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण देण्यास अपयशी ठरतंय असा आरोप अक्षय शिंदे यांनी केला आहे.