सोयगाव,दि.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
गोंदेगाव ता.सोयगाव जवळच असलेल्या चिंचखेडा ता,पाचोरा येथील कोरोना सकारात्मक असलेला रुग्णाचा गोंदेगावला संपर्क आल्याने मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी एका खासगी डॉक्टरसह तिघांचे स्वॅब शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आले आहे.जिल्हाबंदी असतांना जळगाव जिल्ह्यातील सकारात्मक रुग्ण गोन्देगावात फिरकला कसा याबाबत मात्र प्रशासन चिंतेत आहे.
गोंदेगाव ता.सोयगाव येथे तापेच्या उपचारासाठी आलेल्या चिंचखेडा ता.पाचोरा येथील रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे पाचोरा आरोग्य विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यावरून गोंदेगावला आलेल्या या रुग्णाच्या संपर्कातील एका खासगी डॉक्टरसह तिघांचे स्वॅब घेण्यात येवून या तिघांना होमकोरोटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
प्रशासनाने स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेत नव्याने मार्गदर्शिका काढल्याने यापुढे आता रुग्णांचे त्यांच्या दारात जावून स्वॅब घेण्याचा नवीन निर्णय घेतला आहे.त्यामुळे तालुका आरोग्य विभागाच्या पथकाकडून पहिल्यांदा सोयगाव तालुक्यात या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आली असून तालुका आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ,कृष्णा घावटे,रवी शेळके आदीच्या पथकाने घरपोच स्वॅब घेतले आहे.