सोयगाव,दि.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यावर शुक्रवारी अचानक काळे ढग दाटून आले परंतु ढग दाटून आल्यावरही अचानक पावसाने दडी मारून पावूस मात्र दुसरीकडेच पळाल्याने शुक्रवारीही सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली होती.
सोयगावसह तालुक्यात पावसाने पुन्हा दुसर्या टप्प्यात दांडी मारली असून शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.खरिपाच्या हंगाम डोलदार झालेला असतांना पावसाने दांडी मारली असून ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.मका पिके जोमदार झाल्रली अस्दातांना या पिकांना पावसाची या कालावधीत वाढीसाठी आवश्यकता आहे.परंतु पावसाच्या खंडाने मक्याची कोवळी अंकुर पिवळी पडत आहे.खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात सोयगाव परिसरात अकरा दिवस पावसाचा पडलेला खंड शेतकऱ्यांनी खतांच्या मात्रा देवून आणि ठिबक सिंचन वर भरून काढला,परंतु पुन्हा आषाढी एकादशीनंतर चौथ्या दिवसाचा मोठा खंड पडल्याने खरीपाची हंगामाची स्थिती बिकट होवून पिकांना पावसाचा ताण पडत आहे.मका,कपाशी,तूर,उडीद,मुग आणि सोयाबीन आदी खरिपाच्या पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे.
शुक्रवारी अचानक काळे ढग दाटून आल्याने शेती शिवारात शेतकऱ्यांनी व मजुरांनी मोठी धावपळ करून हातातील कामे आटोपण्याकडे कल दिला परंतु दाटून आलेल्या काळ्या ढगांनी अचानक धोका दिल्याने तालुक्यात कुठेही मोठा पावूस झाला नव्हता,आलेले ढग पाहून सोयगाव परिसरात मोठा पावूस होण्याचा अंदाज वर्तविण्यात यत होता.परंतु पावूस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती.
सोयगाव तालुक्यात ९३ टक्के खरिपाच्या पेरण्या-
सोयगाव तालुक्यात यंदाच्या हंगामात खरिपाच्या ९३ टक्के पेरण्या झालेल्या आहे.खरिपाच्या लागवडी क्षेत्रावरील ४३ हजार हेक्टर पैकी ४२,४५८ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असतांना मात्र पावसाचा खंड या खरिपाच्या हंगामाला अडसर ठरत आहे.
काले मेघा,काले मेघा पाणी तो बरसाव-
सोयगाव परिसरात पावसाचा मोठा खंड पडल्याने पावूस होत नसल्याने परिसरात दाटून आलेल्या काळ्याशार ढगांना काले मेघा,काले मेघा पाणी तो बरसाव या गाण्याची शेतकऱ्यांना आठवण होवून पावसाच्या आठवणी ताज्या होता आहे.