नाशिक:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील वैदयकीय अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेले विध्यार्थी (एमबीबीएस ,बीडीएस ,बीएएमएस व इतर) यांच्या परीक्षा कोरोना कालावधीत देखील होणार असल्याचे वृत्त वेळोवेळी येत आहे.अशात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता हे आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय का घेत नाही ? बाकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्याप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देखील परीक्षा रद्द करण्यात यायला हव्यात परंतु असा निर्णय होत नाही. कोरोनाचे संकट लक्षात घेता सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द कराव्यात व पुढील वर्षात प्रोमोट करावे अशी मागणी विध्यार्थ्यांची ,पालकांची आहे.यावर सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.