अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करा –राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे 'पर्यावरणाचा -हास होत असून सध्या त्याचा परिणाम हा पर्जन्यमानावर ही झाला आहे.कारण,पाऊस हा टप्प्याटप्प्याने होत आहे.याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी आपले कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे,' असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार बीड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये,विविध समाजसेवी,सहकारी संस्था-संघटना,
बँका,पतसंस्था,शाळा-महाविद्यालयांनी सहभाग घ्यावा,डोंगरपट्टा,मोकळी मैदाने तसेच शक्य त्या सार्वजनिक ठिकाणी,घर आणि परिसरात वृक्ष लागवड करण्यात यावी.एक लोक चळवळ म्हणून बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन मोदी यांचे वतीने करण्यात आले आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  काँग्रेस कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा

  पालकांनी मुलींच्या प्रत्येक वाढदिवसाला मुलींच्या नांवे एक वृक्ष रोप लावण्याचे आवाहन करून बीड जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेवून
  वृक्षारोपण उपक्रम आयोजित करावेत. वृक्षारोपण करणा-या खड्डयामध्ये माती,खत योग्य प्रमाणात असावे.ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे.तिथे वृक्षारोपण करा.झाडांना नियमीत पाणी घालून झाडे जगवा.वनराई निर्माण करा.बीड जिल्ह्याला डोंगर,द-या आणि मोठ्या प्रमाणावर खडकाळ जमीन आहे.ही जमीन हिरवीगार करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण सर्वजण एकञित येवून सामुहिक प्रयत्न करूयात.

  -राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.