परळीत गावठी पिस्तूलासह दोघांना केले जेरबंद ,अग्रवाल लाॅजजवळ एलसीबी पथकाची कारवाई

परळी(बीड) दि.०४:आठवडा विशेष टीम गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसासह एलसीबीच्या पथकाने भरदिवसा दोघांना ताब्यात घेतले. ही खळबळजनक घटना अग्रवाल लाॅजजवळ घडली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील अग्रवाल लाॅजजवळ दोघेजण गावठी पिस्तूल आणि काडतुसासह असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने धाडसी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, जमादार भास्कर केंद्रे, मुंजा कुंवारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, रामदास तांदळे, चालक अतुल हराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एलसीबीच्या पथकाने. या दोन आरोपीला ज्ञानोबा मारोती गित्ते (गोट्या), आनंद जय अग्रवाल या दोघांना ताब्यात घेतले असुन कलम 3(25)भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरीकांतुन समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *