अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्ह्यात चालू वर्षाचा खरीप हंगाम पिक विमा भरणा सुरू करून उर्वरित शेतक-यांचा सन २०१८ चा खरीप व रब्बी तसेच २०१९ चा खरीपाचा पिक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी शुक्रवार,दिनांक 3 जुलै रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे (महाराष्ट्र राज्य) प्रमुख मार्गदर्शक-सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील चालू वर्षाचा खरीप हंगामाचा पिक विमा भरणा तात्काळ पूर्ण करून व तसेच उर्वरित शेतक-यांची मागील बाकी सन २०१८ चा खरीप व रब्बी आणि २०१९ या खरीपाचा पिक विमा तात्काळ द्यावा.आपल्या भारत देशाचा शेतकरी हा मुलभूत घटक असून शासनाने सन-२०१६ रोजी शेतक-यांच्या हिताचे रक्षण करावे.पिकांची नुकसान भरपाई व पिक विमा मिळणेसाठी निर्णय घेतला होता व तो सन २०१७ पर्यत अदा केला.परंतू,सन २०१८ पासून खरीप आणि रब्बी व सन २०१९ या खरीप पिकांचे व तसेच उर्वरित शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच सध्या जगात कोरोना साथरोगाने थैमान घातले आहे असे असताना सुध्दा शासनाने त्यांना पिक विमा दिलेला नाही व त्यांना सन २०२०- २०२१ चा खरीपाचा पिक विमा भरण्यास बीड जिल्हा वगळला आहे.कोणतीही विमा कंपनी विमा घेण्यास तयार नाही.त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतक-यांवर घोर अन्याय होत आहे.तरी शासनाने तात्काळ सन २०२०-२०२१ चा पिक विमा तात्काळ भरून घ्यावा.तसेच उर्वरित शेतक-यांचा सन २०१८ चा खरीप व रब्बी आणि २०१९ चा खरीप पिक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.